जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:50 IST2022-03-10T11:49:47+5:302022-03-10T11:50:52+5:30
पिंपरी : अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. मोरेवस्ती, चिखली ...

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. मोरेवस्ती, चिखली येथे २२ ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. दत्ता कमलाकर सूर्यवंशी (वय ३६, रा. मोरेवस्ती, चिखली), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी (दि. ९) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी तरुण हा भावाच्या लग्नासाठी घेऊन गेला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला आरोपीने त्याच्या घरी ठेवून घेऊन तिला हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे.