By admin | Published: February 8, 2017 11:23 PM2017-02-08T23:23:12+5:302017-02-08T23:23:12+5:30
शैला मोळक यांना भाजपाची उमेदवारी
Next
पिंपरी : चहोेली-मोशी प्रभाग क्रमांक तीन 'क' मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपाकडून दोन महिला उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. दोन्ही फॉर्म छाननी मध्ये वैध ठरविले होते. त्यात भाजपाच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांनी सर्वप्रथम एबी फॉर्म दिल्याने मोळक यांना भाजपाची उमेदवारी दिली आहे.
चहोेली-मोशी प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपा मोळक व आमदार महेश लांडगे समर्थक साधना तापकीर यांना एबी फॉर्म मिळाले असलेने नक्की अधिकृत भाजपाचा उमेदवार कोण हि उत्सुकता होती. जुन्या नव्यांचा वाद यावरून उघड झाला होता. उमेदवारी माघारीनंतर चिन्ह वाटपात काय होणार याबाबत चर्चा होती. दोघांना एबी फॉर्म दिले तरी उमदेवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित पक्षाने लेखी पत्र द्यायचे असते. मात्र, यात दिले गेले नाही. त्यामुळे चिन्ह वाटपाच्या वेळी निवडणूकीसंदर्भात असणाºया नियमाच्या आधारे ज्या उमेदवाराचा एबी फॉर्म अगोदर आला. त्यास उमेदवारी देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मोळक यांचा एबी फॉर्म अगोदर आला होता. त्यांना पक्षाचे चिन्ह देण्यात आले.