पतीसोबतचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितले दहा लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 04:19 PM2018-12-16T16:19:59+5:302018-12-16T16:22:04+5:30

एका २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही तरुणी त्याच्या घरी गेली असता त्याच्या पत्नीने त्यांचे काढलेले फोटो डिलिट करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते फोटो सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी दिली.

she demandes 10 lakh rupees by threatening to viral sexual photos | पतीसोबतचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितले दहा लाख

पतीसोबतचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितले दहा लाख

Next

पिंपरी : एका २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही तरुणी त्याच्या घरी गेली असता त्याच्या पत्नीने त्यांचे काढलेले फोटो डिलिट करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते फोटो सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


    अमोल गायकवाड, सोनाली अमोल गायकवाड (दोघेही रा. गणेश मंदीराजवळ, तळयाजवळ, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल गायकवाड याने स्वत:चे लग्न झालेले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तळेगाव दाभाडे येथील लॉजवर नेवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. त्यानंतरही वेगवेगळया ठिकाणी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्याने घरातील विविध अडचणी सांगून तिच्याकडून ४० हजार रुपये घेतले. हा प्रकार २९ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०१८ दरम्यान घडला. 


    त्यानंतर १० डिसेंबरला ही तरुणी त्याच्या घरी गेली असता सोनाली गायकवाड हिने त्यांचे काढलेले फोटो तिला दाखविले. हे फोटो डिलिट करायचे असेल तर १० लाख रुपये दे अशी खंडणी मागितली. पैसे न दिल्यास हे फोटो सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या तरुणीने तिला असे न करण्याची विनवणी केली असता तिने चिडून फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: she demandes 10 lakh rupees by threatening to viral sexual photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.