शेट्टी खून प्रकरणाचा पुन्हा तपास

By admin | Published: February 17, 2015 01:58 AM2015-02-17T01:58:11+5:302015-02-17T01:58:11+5:30

पुणे जिल्ह्यातील तळगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणाचा बंद केलेला तपास नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shetty murder case again investigated | शेट्टी खून प्रकरणाचा पुन्हा तपास

शेट्टी खून प्रकरणाचा पुन्हा तपास

Next

नली दिल्ली : गेल्या जानेवारीत एका आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यलय आणि निवासस्थानी टाकलेल्या धाडींमध्ये नवे पुरावे हाती लागल्यानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) पुणे जिल्ह्यातील तळगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणाचा बंद केलेला तपास नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय गेल्या वर्षी जूनमध्ये झाला होता व त्यानुसार पुणे येथील विशेष न्यायालयात आॅगस्टमध्ये ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला गेला होता.
सूत्रांनी सांगितले की, गेल्या नोव्हेंबरमध्ये नोंदविलेल्या एका वेगळ््या प्रकरणाच्या संदर्भात जानेवारीत एका आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालय आणि घरी घेतलेल्या झडतीमध्ये शेट्टी खून प्रकरणातील संभाव्य दुर्लक्षित पुराव्यांकडे संकेत करणारी काही कागदपत्रे मिळाल्यानंतर शेट्टी खूनाचा नव्याने तपास करण्याचे ठरविण्यात आले आहे.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेला लागून असलेली काही जमीन बळकाविल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीआयने स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तपासातून असे दिसून आले की, सतीश शेट्टी यांनीही आयआरबीने कथितरित्या बळकाविलेल्या जमिनीविषयीची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. त्यामुळे त्यांच्या खुनाचा या आरोपाशी काही संबंध असावा असा दुवा दिसू लागला. परिणामी उच्च न्यायालयास विनंती करून सीबीआयने जमीन बळकाव प्रकरणाचा तपासही स्वत:कडे घेतला होता.
सूत्रांनुसार जमीन बळकाव प्रकरणी आयआरबीची एक सहयोगी कंपनी असलेल्या आर्यन इन्फ्रास्ट्रक्चरचे अधिकारी दीपक दत्तात्रेय गाडगीळ यांच्याविरुद्ध सीबीआयने फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करणे यासह इतर कलमांखाली गुन्हा नोंदविला होता. सूत्रांनुसार याच अनुषंगाने नंतर गाडगीळ व आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांची कार्र्यालये व निवासस्थाने यासह २१ ठिकाणी धाडी टाकून झडती घेण्यात आली होती. अशीच झडती इतरही १५ व्यक्तींच्या बाबतीत घेण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

च्आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांची कार्र्यालये व निवासस्थाने यासह २१ ठिकाणी धाडी टाकून झडती घेण्यात आली होती. अशीच झडती इतरही १५ व्यक्तींच्या बाबतीत घेण्यात आली होती.

Web Title: Shetty murder case again investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.