श्रीकर परदेशींमुळे पिंपरीला डावलले!

By admin | Published: September 4, 2015 02:12 AM2015-09-04T02:12:14+5:302015-09-04T02:12:14+5:30

येथील महापालिकेतील भ्रष्ट कारभार तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जवळून पाहिला आहे. हेच परदेशीसाहेब केंद्रात सचिव आहेत. कदाचित त्यांनी महापालिकेच्या कारभाराची वस्तुस्थिती

Shikar Dasari Pindarila due to foreigners! | श्रीकर परदेशींमुळे पिंपरीला डावलले!

श्रीकर परदेशींमुळे पिंपरीला डावलले!

Next

पिंपरी : येथील महापालिकेतील भ्रष्ट कारभार तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जवळून पाहिला आहे. हेच परदेशीसाहेब केंद्रात सचिव आहेत. कदाचित त्यांनी महापालिकेच्या कारभाराची वस्तुस्थिती सांगितल्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहराला डावलले असावे, असा गौप्यस्फोट भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दहा शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची एकत्रित शिफारस केल्याची घोषणा केली. ाज्यातील स्मार्ट शहरांच्या गुणवत्ता यादीत पहिल्या पाचमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होता, तरीही केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतून शहराला का डावलले? त्या वेळी शहरातील भाजपा-शिवसेना युतीचे खासदार व आमदार काय करीत होते? असा सवाल पत्रकार परिषदेत जगताप यांना विचारण्यात आला. त्या वेळी जगताप यांनी थोडे स्मितहास्य करीत, आपल्या सर्वांनाच महापालिकेचा कारभार माहिती असल्याची टिप्पणी केली. तुमचा अजूनही श्रीकर परदेशी यांच्यावर राग आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करीत आहात काय? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर जगताप म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांच्या विषयावर केवळ आमच्यामध्ये मतभेद होते. परंतु, परदेशी यांच्या इतर कारभारावर माझा कोणताही आक्षेप नव्हता. उलट त्यांनी सुरू केलेल्या इतर उपक्रमांचे मी कौतुकही केले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार त्यांना माहिती आहे. ही वस्तुस्थिती त्यांनी लक्षात आणून दिली असावी. परिणामत: स्मार्ट सिटीत शहराचा समावेश झाला नसावा.’’
(प्रतिनिधी)

Web Title: Shikar Dasari Pindarila due to foreigners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.