कर्जबाजारीपणामुळे चिंचवडचे शिंदे कुटुंबीय गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:11 AM2018-12-21T00:11:56+5:302018-12-21T00:12:16+5:30

अडीच कोटींचे कर्ज : घरी सुसाईड नोट

Shinde family of Chinchwad disappeared due to indebtedness | कर्जबाजारीपणामुळे चिंचवडचे शिंदे कुटुंबीय गायब

कर्जबाजारीपणामुळे चिंचवडचे शिंदे कुटुंबीय गायब

googlenewsNext

पिंपरी : कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चार जण बेपत्ता झाले आहेत. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवून संतोष शिंदे हे पत्नी व दोन मुलांसह घराबाहेर पडले. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे. ५ डिसेंबरपासून बेपत्ता झालेल्या शिंदे कुटुंबातील कोणाशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या बंधूने पिंपरी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असलेल्या संतोष शिंदे यांनी पत्नी सविता, मुलगा मुकुंद आणि मुलगी मैथिली यांच्यासह मोहननगर येथील घर सोडले. घरातून निघून गेलेल्या शिंदे कुटुंबातील चौघांचा १५ दिवस झाले थांगपत्ता लागलेला नाही. शिंदे यांच्यासह त्यांचा २१ वर्षांचा मुलगा मुकुंद, १६ वर्षांची मुलगी मैथली हेसुद्धा घरातून बाहेर निघून गेले आहेत. शिंदे कुटुंबीय चिंचवड मोहननगरमधील रहिवासी आहेत. गणपती मंदिर, कराळे चाळ या परिसरात त्यांचे घर आहे. घराच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. शिंदे यांचा पिंपरीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून तसेच वारंवार खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. दोन कोटींहून अधिक कर्ज झाले.
व्यवसायासाठी तसेच घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मागील काही महिन्यांपासून थकले होते. या कर्जवसुलीसाठी बँकांनी तगादा लावला होता. खासगी सावकारांचा ससेमिरा मागे लागला होता.
बँकेने मालमत्ता जप्तीची नोटीसही दिली होती.

४कर्जाच्या विळख्यात अडकल्याने शिंदे कुटुंबीय बेजार झाले होते. बँकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते. या भीतीने शिंदे कुटुंबीय विंवचनेत होते. बँकेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे कुटुंबीय सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सुसाईड नोट व मोबाइल मिळाला
४कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार आहे. इतर कोणाला दोषी धरू नये. मी स्वत: घर सोडून निघून जात आहे. आम्ही चौघेही आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत आहोत, हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे, असे सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवले आहे. संतोष यांच्या भावाने कुटुंबातील सदस्यांशी संपर्क होत नसल्याने ६ डिसेंबरला पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोणीही मोबाइलवर उपलब्ध होत नाही, म्हणून सर्वत्र शोधाशोध केली, त्या वेळी चौघांचे मोबाइल आणि सुसाईड नोट घरात आढळून आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Shinde family of Chinchwad disappeared due to indebtedness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.