उद्योगनगरी झाली बंदुकीचे शहर, गावठी कट्टे, परदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:49 AM2018-04-02T03:49:38+5:302018-04-02T03:49:38+5:30

शहरात घरफोडी, भुरट्या चोऱ्या आणि हाणामारी अशा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातही पिस्तूल वापरात येत आहे. शहरातील गुन्हेगारांचे पिस्तूल वापराचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा शस्त्र बाळगणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तरच पिस्तूल बाळगणाºयांची काही प्रमाणात आकडेवारी मिळते.

 Ships, hawthorns, foreign-made pistol markets | उद्योगनगरी झाली बंदुकीचे शहर, गावठी कट्टे, परदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा बाजार

उद्योगनगरी झाली बंदुकीचे शहर, गावठी कट्टे, परदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा बाजार

Next

पिंपरी - शहरात घरफोडी, भुरट्या चोऱ्या आणि हाणामारी अशा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातही पिस्तूल वापरात येत आहे. शहरातील गुन्हेगारांचे पिस्तूल वापराचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा शस्त्र बाळगणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तरच पिस्तूल बाळगणाºयांची काही प्रमाणात आकडेवारी मिळते. बेकायदा पिस्तूल बाळगणाºयांचे रेकॉर्ड उपलब्ध नसले, तरी घडणाºया घटनांच्या माध्यमातून हे बंदुकीचे शहर असल्याची प्रचिती येत आहे. पिस्तूलविक्रीच्या रॅकेटचे परराज्याशी कनेक्शन असल्याचे यापूर्वीच पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडीत गोळीबाराची घटना घडल्याने पिस्तूल वापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दोन वर्षांत परिमंडल तीनच्या हद्दीत भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, तसेच हिंजवडी आदी ठिकाणी पिस्तूल बाळगणारे आरोपी वारंवार आढळून आले आहेत. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्यांकडे पिस्तूल, जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. रस्त्यावर वाहनांची प्रतीक्षा करणारे, तसेच निर्जन ठिकाणाहून जाणारे यांना रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याच्या घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत आहे. बेकायदा पिस्तूल बाळगणाºयांना एकदा पकडले जाते. बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल होतो. जामिनावर सुटल्यानंतर हे आरोपी पुन्हा शस्त्र खरेदी करतात. पिस्तूलविक्रीच्या या छुप्या बाजारपेठेची त्यांना चांगलीच माहिती असते. पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले, तरी ते आणखी पिस्तूल मिळवितात.
वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे २० मार्चला गोळीबाराची घटना घडली. त्यातील जखमीने फिर्याद देण्याचे टाळले. लोखंडी सळईने जखम झाली असे सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनीच गोळीबार झाल्याची फिर्याद दाखल केली.
काळभोरनगरमध्ये स्थानिक गुंडांच्या वर्चस्व वादातून एकाचा खून झाला. सोन्या काळभोर आणि महाकाली गॅँगचा सदस्य अनिकेत जाधव यांच्यात झालेल्या चकमकीत जाधव मारला गेला. तो २४ तास दोन पिस्तूल बाळगून असे. पोलिसांनी ते पकडले, जप्त केले, तरी त्याच्याकडे आणखी पिस्तूल उपलब्ध होत असे. पिस्तूल जप्त तरी किती करायची, असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित होत असे. गोळीबार करताना चुकून पिस्तूल खाली पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सराइतासह अगदी अल्पवयीन गुन्हेगारांकडेसुद्धा पिस्तूल आढळून येत आहे. वाढदिवसाला हवेत गोळीबार करण्याच्या घटना शहरात या आधी घडलेल्या आहेत. आता तर वाढदिवस साजरा करताना, तलवारने केक कापण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शहर धोक्याच्या वळणावर आहे.

परदेशी बनावटीचे पिस्तूल
गुन्हे शाखा युनिट चारच्या कारवाईत चंदन सुरेंद्र सिंग हा बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे जाळ्यात अडकला. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. परदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या मुकेश ओमप्रकाश मंगोत्रा याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला पिस्तूल, तसेच जिवंत काडतुसे या मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. चेतन विश्वकर्मा याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी विश्वकर्मा याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुंडा स्कॉडच्या पथकाने सापळा रचून मुकेश मंगोत्रा याला पिस्तूल विक्रीस आला असता ताब्यात घेतले होते.

पिस्तूल २५ तर कट्टा १२ हजारांत
गुंडांना त्यांच्या रॅकेटमधून अवघ्या २५ हजार रुपयांत पिस्तूल मिळते. गावठी कट्टा तर अवघ्या १२ हजार रुपयांत मिळतो. देशी, परदेशी बनावटीच्या पिस्तूलसह गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याने चाकू, सुºयाने मारामारी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी नंग्या तलवारी, कोयते घेऊन टोळक्यांचा वावर दिसून येतो. परंतु खून, धमकावणे आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणात राजरोसपणे पिस्तुलाचा वापर केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली असल्याने शहरातील पिस्तुलाची बाजारपेठही वाढली आहे.

विक्रीचे परप्रांतीयांशी रॅकेट

कधी खंडणीविरोधी पथकाला, तर कधी स्थानिक पोलिसांना गस्तीवर असताना पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे आढळून येत आहेत. परराज्यांतून गावठी कट्टे, पिस्तूल राजरोसपणे शहरात आणून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
उत्तर प्रदेशातून येणारे पिस्तूल शहरात राजरोसपणे विक्री होत आहेत.
उत्तर प्रदेशातून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणीविरोधी पथकाने मोशी, बोºहाडेवस्ती येथे पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला. महंमद मोईन समीम उद्दीन ऊर्फ बाबू खान असे त्या आरोपीचे नाव होते. महंमद हा मूळचा उत्तर प्रदेश येथील (ग्राम गंदियानी, तालुका सौराव, जिल्हा अलाहाबाद) येथील रहिवासी आहे. तो आदर्शनगर, मोशी येथे वास्तव्यास होता. त्याच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता.

Web Title:  Ships, hawthorns, foreign-made pistol markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.