शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 03:32 AM2018-03-05T03:32:34+5:302018-03-05T03:32:34+5:30

लोणावळा शहरासह गावोगावी मोठ्या जल्लोषात रविवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. दोन दिवसांपासून गावोगावचे शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड, लोहगड, विसापूर, तिकोना, राजमाची, तुंग, वित्तडगड, कोराईगड, इंदोरी, राजगड, सज्जनगड, पन्हाळा अशा विविध गडांवर शिवज्योत आणण्याकरिता गेले होते.

 Shiv Jayanti celebrates in a warm atmosphere | शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

Next

लोणावळा -  लोणावळा शहरासह गावोगावी मोठ्या जल्लोषात रविवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. दोन दिवसांपासून गावोगावचे शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड, लोहगड, विसापूर, तिकोना, राजमाची, तुंग, वित्तडगड, कोराईगड, इंदोरी, राजगड, सज्जनगड, पन्हाळा अशा विविध गडांवर शिवज्योत आणण्याकरिता गेले होते.
सकाळपासूनच या शिवज्योतीचे आगमन लोणावळा शहरात झाले. लोणावळ्यातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरिता शहर व ग्रामीण भागातील सर्व शिवज्योती येत होत्या. या शिवज्योतीचे जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
मुख्य चौकात दर वर्षीप्रमाणे श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच आलेल्या शिवभक्तांना पिण्याचे पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. लोणावळा यंग टायगर ग्रुपच्या वतीने देखील पिण्याचे पाणी व सरबतवाटप झाले. शिवसेनेच्या वतीने कुमार चौक ते बाजारपेठ दरम्यान जागोजागी स्वागत कमानी व दोन्ही बाजूंना कनाती लावण्यात आल्याने संपूर्ण शहर शिवमय व भगवे झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. तरुणाई हातात भगवे झेंडे व शिवज्योती घेऊन धावत होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरण व जल्लोषात शिवजयंतीचा हा सण साजरा होत होता.

अनाथांकडून
शिवज्योतीचे स्वागत

कामशेत : कान्हे येथील साईबाबा सेवाधाम या अंध व अपंगांच्या संस्थेत अनाथ मुलांकडून तिथीप्रमाणे आलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी सेवाधाम ट्रस्ट मालेगाव आश्रमशाळा येथील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शिवज्योतीची मिरवणूक काढून साईबाबा मंदिरात छत्रपती महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली.
४या वेळी साईबाबा आश्रमशाळेतील शिक्षक जीवन वाडेकर यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कार्याची माहिती दिली. मंदिराचे पुजारी हभप पुरुषोत्तम खर्चेमहाराज यांनी मनोगत व्यक्त केले. हभप दत्तात्रयमहाराज हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमासाठी दत्तात्रय चांदगुडे, सदाशिव वरघडे, रामदास चांदगुडे, महेंद्र पाटील, बाळकृष्ण सांगळे, मारुती गावडे, सुनील सातकर, लक्ष्मण गजभिव, शिवलिंग तोडकर, टीकाराम सोनार, अशोक अंगरखे, दत्तात्रय भुंडे आदींनी परिश्रम घेतले.


गावे झाली शिवमय
कार्ला : शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवारी सायंकाळपासून मावळ, पुणे जिल्हा येथून लोहगड, विसापूर या किल्ल्यांवर शिवज्योती जात होत्या. शिवभक्तांच्या शिवाजीमहाराज की जय या गजराने लोहगड, विसापूर किल्ला परिसराबरोबर किल्ल्याकडे जाणाºया रस्त्याकडेची गावेही शिवमय झाली होती. संपूर्ण परिसर महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. कार्ला परिसरातील अनेक गावांतील शिवभक्तही ठिकठिकाणी शिवज्योत आणायला गेले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत सुहासिनींनी शिवज्योतीचे स्वागत केले. कार्ल्यातही दर वर्षीप्रमाणे ‘एक गाव एक शिवजयंती’ तरुणांच्या पुढाकाराने उत्साहात साजरी होत आहे. येथील तरुणांनी प्रतापगडावरून शिवज्योत आणली.

अल्पोपहाराचे वाटप
कार्ला : लोहगड-विसापूर किल्ल्यांवरून शिवज्योत घेऊन येणाºया शिवज्योतींचे कार्ला येथे स्वागत करण्यात आले. तसेच शिवज्योत घेऊन येणाºया शिवभक्तांसाठी, शिवप्रेमींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्रातून लोहगड, विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन जाणाºया व कार्ला परिसरातील शिवज्योतींचे स्वागत कार्ला येथे करण्यात आले. गणेश हुलावळे यांच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले. शिवराम हुलावळे, रघुनाथ सावंत,शिवशंकर तरुण मंडळाचे अध्यक्ष दिलीप हुलावळे, मावळ विधानसभा युवा सेना चिटणीस विशाल हुलावळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. संभाजी हुलावळे, भरत हुलावळे, रोहिदास शिर्के, विशाल वसंत हुलावळे, गणेश हुलावळे, शिवशंकर तरुण मंडळ,शिवसेना-युवा सेना शाखा यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आयोजन युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांनी केले होते.

लोणावळा शहरातील तुंगार्ली, भांगरवाडी, नांगरगाव, वलवण, खंडाळा, रामनगर, भुशी, कुसगाव, डोंगरगाव, कुसगाववाडी, ओळकाईवाडी, औंढे, औंढोली, वरसोली, वाकसई चाळ, वाकसई, देवघर, करंडोली, कार्ला, वेहेरगाव, मळवली, शिलाटणे, सदापूर, पाटण, बोरज, पाथरगाव यासह गावोगावी ढोल-ताशाच्या गजरात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. शिवसेनेच्या वतीने लोणावळा शहरात व खंडाळा शहरात शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तुंगार्ली व कुसगाव यांच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या होत्या. आबालवृद्धांसह महिलांचादेखील मोठा सहभाग या मिरवणुकांमध्ये पाहायला मिळत होता. वाहतूक नियोजन व कायदा-सुव्यवस्था राखण्याकरिता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, शिवाजी दरेकर, बालाजी गायकवाड, प्रकाश शितोळे तैनात होते.

Web Title:  Shiv Jayanti celebrates in a warm atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.