महापालिकेत शिवसेना नगरसेविकेचा विषय समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 08:26 PM2019-05-20T20:26:44+5:302019-05-20T20:28:11+5:30
महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी निवड झाली.
पिंपरी : महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची सोमवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. यात रेखा दर्शले यांनी त्यांची नियुक्ती जाहीर होताच तडकाफडकी सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.
महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी निवड झाली.पक्षीय संख्याबळानुसार प्रत्येक समितीत एक नगरसेवकाची यानुसार शिवसेनेच्या चार सदस्यांची निवड करण्यात आली.
शिवसेनेत खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे असे दोन गट आहे. त्यामुळे शिवसेनेत धुसफूस सुरू असते. विषय समिती सदस्यांच्या निवडीत बारणे गटाचे प्रमोद कुटे, नीलेश बारणे, अश्विनी चिंचवडे यांची आणि राहुल कलाटे यांच्या प्रभागातील नगरसेविका रेखा दर्शले यांची वर्णी लागली.
कोणत्याही प्रकारच्या गटबाजीतून नव्हे तर वैयक्तिक कारणास्तव आपण विषय समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या सदस्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे नागरिकांची कामे मार्गी लागण्यास त्याचा उपयोग होत नाही.
- रेखा दर्शले, नगरसेविका, शिवसेना