शिवसेनेतर्फे गाठीभेटींवर भर
By admin | Published: February 17, 2017 04:49 AM2017-02-17T04:49:58+5:302017-02-17T04:49:58+5:30
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. शिवसेनेतर्फे थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून गुरुवार सुटीच्या दिवशी
पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. शिवसेनेतर्फे थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून गुरुवार सुटीच्या दिवशी पदयात्रा आणि गाठीभेटींवर भर देण्यात आला. या वेळी थेरगाव परिसराचा विकास करण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून विकास साधला आहे. या परिसराचा आणखी विकास करण्यासाठी नागरिकांनी शिवसेनेला मतदान करावे, विकासाला मत म्हणजेच शिवसेनेला मत होय, असे आवाहन असे मत खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वतीने थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून आज पदयात्रा आणि गाठीभेटींवर भर देण्यात आला. या वेळी उमेदवार शालिनी कांतीलाल गुजर, नीलेश बारणे, सचिन भोसले, दीपाली गुजर सहभागी झाले होते. पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत सहभागी होऊन खासदार बारणे यांनी मतदारांना आवाहन केले.
प्रत्येकाच्या डोक्यावर धनुष्यबाण असणारी टोपी, भगवे झेंडे होते. ‘खिच के तान धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. थेरगाव वॉर्डातील विविध सोसायट्यामधील मतदारांशी संवाद साधला.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे प्रभागाचा विकास साधण्यासाठी विकासासाठी शिवसेनेला साथ द्या.’’
प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कांतिलाल गुजर म्हणाले, ‘‘महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. विचार आणि विकासाची दिशा शिवसेनेकडे आहे. अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव परिसराचा विकास झाला आहे. विकासासाठी शिवसेनेची ताकत वाढवायला हवी.’’ (प्रतिनिधी)