शिवसेनेचा भाजपाला अल्टिमेटम
By admin | Published: January 14, 2017 02:56 AM2017-01-14T02:56:40+5:302017-01-14T02:56:40+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे भाजपा-शिवसेनेच्या युतीचे गुऱ्हाळ कायम आहे. युतीबाबत दोन्ही पक्षांच्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे भाजपा-शिवसेनेच्या युतीचे गुऱ्हाळ कायम आहे. युतीबाबत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची सकारात्मक चर्चा झाली. आकुर्डीत झालेल्या बैठकीतही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, युतीबाबत २० जानेवारीपूर्वी निर्णय घ्यावा, असा अल्टीमेटम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपलाच्या नेत्यांना दिला आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावण्यासाठी शिवसेना-भाजपाची युती होणे आवश्यक आहे, असे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते याबाबत सकारात्मक आहेत. आकुर्डीतील बैठकीस शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल
कलाटे, भाजपाच्या वतीने खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)