शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोडले पिंपरी चिंचवड पालिकेच्या आरोग्य विभागात डुक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:25 PM2018-09-03T17:25:15+5:302018-09-03T17:28:10+5:30

प्रभागात डुकरांचा सुळसुळाट वाढला असून त्याकडे पालिका प्रशासना दुर्लक्ष करत असल्याचा अाराेप करत शिवसेनेचे नगरसेवक सचिन भाेसले यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्कर साेडले.

shivsena corporater brought pig into the health department of pcmc | शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोडले पिंपरी चिंचवड पालिकेच्या आरोग्य विभागात डुक्कर

शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोडले पिंपरी चिंचवड पालिकेच्या आरोग्य विभागात डुक्कर

Next

पिंपरी चिंचवड : थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर सोडले.

प्रभाग क्रमांक २४ थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुक्करांचा सुळसुळाट सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून डुक्करांच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून डुक्करांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना निवेदन दिले होते. त्यांना डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. 

थेरगाव परिसरात तीनशे डुक्करे आहेत. त्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त असून पालिका  डुक्करांचा बंदोबस्त करत नाही. त्याच्या निषेधार्थ जीवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांना भेट दिल्याचे, नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले.

Web Title: shivsena corporater brought pig into the health department of pcmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.