धक्कादायक ! धुळवड खेळताना आठ वर्षाच्या मुलावर फेकले अॅसीड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:25 PM2020-03-12T12:25:00+5:302020-03-12T12:25:52+5:30
धुळवडीच्या दिवशी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर अॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पिंपरी : धुळवड खेळताना अल्पवयीन मुलाने दुसठया अल्पवयीन मुलाच्या अंगावर अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. यामध्ये आठ वर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सांगवी येथे घडली.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलाच्या ३५ वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अॅसिड फेकणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दोन्ही मुले सांगवी येथे एकाच भागात राहतात. मंगळवारी सकाळी धुळवडीनिमित्त दोघेही रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडले. रंग खेळत असताना एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या मुलाच्या अंगावर अॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. यामध्ये मुलाच्या अंगातील टी-शर्टसह कातडी देखील जळाली. जखमी मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
दरम्यान धुळवडीच्या दिवशी पुण्यातील खैरेवाडी येथे दाेन गटात जबर हाणामारी झाली हाेती. यात टाेळक्यांनी परिसरातील अनेक गाड्यांची ताेडफाेड केली तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.