धक्कादायक! दारु पिऊन पित्यानेच घेतला मुलाच्या मांडीला चावा; ताथवडे परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:11 IST2021-02-12T17:10:37+5:302021-02-12T17:11:21+5:30
तुम्ही असे का करता याचा जाब विचारल्याने वडिलांनी मुलाला शिवीगाळ करत त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला कडाडून चावा घेतला.

धक्कादायक! दारु पिऊन पित्यानेच घेतला मुलाच्या मांडीला चावा; ताथवडे परिसरातील घटना
पिंपरी : दारूच्या नशेत माणूस कुठले कृत्य करेल ते काही सांगता येत नाही.या नशेच्या काळात मग आपले कुटुंब देखील विसरून जातो. पण जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा घटना घडून गेलेली असते.असाच काहीसा प्रकार ताथवडे येथे घडली आहे. दारु पिऊन पित्याने मुलाच्या मांडीला रक्त येईपर्यंत कडकडून चावा घेतल्याची घटना ताथवडे परिसरात घडली.
या प्रकरणी किरण दिनकर मोरे (वय ५५, रा. सुंदरमोहन पार्क, बालाजी लॉ कॉलेज, ताथवडे) याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल किरण मोरे (वय २७) यांनी फिर्याद दिली.
वडील दहा फेब्रुवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आले. आजी आणि बही ण त्यावेळी घरात होती. त्यांनी घरातील संगणक, टीव्ही आणि इतर सामान विस्कटले. तुम्ही असे का करता याचा जाब विचारल्याने वडिलांनी मुलाला शिवीगाळ केली. झटापटीत वडिलांनी मुलाच्या उजव्या पायाच्या मांडीला कडाडून चावा घेतला. गळ्याला ओरखडून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादींच्या मांडीतून रक्त आल्याने दुखापतीचा गुन्हा दाखल केला.