धक्कादायक! सीए असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 04:14 PM2020-11-23T16:14:06+5:302020-11-23T16:14:23+5:30

रहाटणी येथील घटना, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

Shocking! A senior citizen with CA committed suicide by jumping from the 13th floor | धक्कादायक! सीए असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

धक्कादायक! सीए असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

googlenewsNext

पिंपरी : सीए असलेल्या ज्येष्ठ नागरिकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. रहाटणी येथील कोकणे चाैक येथे सोमवारी (दि. २३) दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुनील हेमचंद्र रानडे (वय ६८, रा. कुणाल आयकाॅन रोड, पिंपळे साैदागर), असे आत्महत्या केलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. रानडे यांना फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी ते रहाटणी येथील कोकणे चाैकातील एका इमारतीत फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेले. तेथील सेल्स विभागाच्या प्रतिनिधीने त्यांना तेराव्या मजल्यावरील फ्लॅट दाखविला. त्यानंतर सेल्स प्रतिनिधी तेथून निघून गेल्यानंतर रानडे यांनी तेराव्या मजल्यावरून उडी मारली. 

याबाबत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रानडे यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. रानडे हे पिंपळे साैदागर येथे त्यांचा मुलगा व सून यांच्यासोबत राहत होते.

Web Title: Shocking! A senior citizen with CA committed suicide by jumping from the 13th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :rahatniरहाटणी