पिंपरीतील धक्कादायक प्रकार! कंपनीचा इमेल आयडी हॅक करून ग्राहकांना लिहिला बदनामीकारक मजकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 03:13 PM2022-04-28T15:13:22+5:302022-04-28T15:13:28+5:30

पीएफच्या वेबसाईटवर ११५० कामगार मृत असल्याचे दर्शविले

Shocking type in Pimpri Defamatory text written to customers by hacking the company email id | पिंपरीतील धक्कादायक प्रकार! कंपनीचा इमेल आयडी हॅक करून ग्राहकांना लिहिला बदनामीकारक मजकूर

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! कंपनीचा इमेल आयडी हॅक करून ग्राहकांना लिहिला बदनामीकारक मजकूर

Next

पिंपरी : कंपनीचा इमेल आयडी हॅक करून कंपनीविषयक बदनामीकारक मजकूर लिहून ग्राहकांना पाठविला. तसेच कंपनीतील व कंपनी सोडून गेलेले असे ११५० कामगारांचा मृत्यू झाला असून ते पीएम अकाउंटमधून बाहेर पडत असल्याबाबत चुकीची माहिती दर्शवली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वडमुखवाडी येथे २० व २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. 

कुमार भरत लोमटे (वय ३४, रा. आळंदी रोड, वडमुखवाडी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची वडमुखवाडी येथे एसआयएस फॅसिलिटी इंडिया प्रा. लि. ही कंपनी आहे. आरोपीन या कंपनीचा तसेच श्रीविनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीचा इमेल आयडी हॅक केला. फिर्यादीच्या कंपनीशी संबंधित असलेल्या ग्राहकांना त्यांच्या व कंपनीविषयी बदनामीकारक मजकूर लिहून पाठविला. तसेच पीएम साईटवर जाऊन एसआयएस फॅसिलिटी इंडिया प्रा. लि. कंपनीचा पीएफ इसॅब्लीशमेंट कोड व श्री विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस कंपनीचा पीएफ इसॅंब्लीशमेंट कोड यावर कंपनीतील व कंपनी सोडून गेलेल अशा ११५० कामगारांचा मृत्यू झाला असून, ते पीएफ अकाउंटमधून बाहेर पडत असल्याबाबत चुकीची माहिती दर्शविली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Shocking type in Pimpri Defamatory text written to customers by hacking the company email id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.