Pimpri Chinchwad: चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग, लाखोंचे नुकसान
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 30, 2023 18:37 IST2023-11-30T18:36:49+5:302023-11-30T18:37:31+5:30
या आगीत अंदाजे चार ते पाच लाख रुपये नुकसान झाले असल्याचे माहिती दिली...

Pimpri Chinchwad: चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग, लाखोंचे नुकसान
पिंपरी : चिखली येथे दुकानाला आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. यात जीवितहानी झाली नसून एक हार्डवेअरचे आणि सलूनच्या दुकानातील खुर्ची, फर्निचर, भांडाराचे साहित्य, सलूनचे सामान, सिलिंग इत्यादींचे नुकसान झाले.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील ऐश्वर्यम हमारा सोसायटी जवळ एका दुकानाला आग लागली असल्याची माहिती दुपारी १.३६ वाजता अग्निशमन दलास मिळाली. त्यानुसार मोशी आणि चिखली उप अग्निशमन केंद्राचे दोन बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत अंदाजे चार ते पाच लाख रुपये नुकसान झाले असल्याचे माहिती दिली. अग्निशमन दलाच्या रवींद्र अहिरे, अशोक गवारी,फायरमन संभाजी दराडे, लीडिंग फायरमन पुंडलिक भुतापल्ले, ट्रेनी फायरमन ऋषिकेश जगताप, संदेश वाढवणे, गोविंद केंद्रे, हर्षद कदम, संकेत सरडे, सागर वाघमारे या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.