तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 09:27 PM2021-08-30T21:27:22+5:302021-08-30T21:28:30+5:30

तपासासाठी दिवसभर पोलिसांसोबत होता फिरत

The shop worker was the thief; 68 bags of sugar were stolen | तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले 

तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले 

Next

पिंपरी : दुकानातून साखरेची ६८ पोती चोरीला गेली होती. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (दि. २७) रात्री १० ते शनिवारी (दि. २८) सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस तपास करीत असताना दुकानातील कामगार पोलिसांना मदत करीत होता. मात्र, मदत करणारा कामगाराच चोरटा असल्याचे निष्पन्न झाले.

नरेशकुमार बाबुलाल सारंग (वय २२, रा. नर्मदा गार्डनसमोर, पिंपळे गुरव) यांनी रविवारी (दि. २९) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जगदीश भागीरथराम बिष्णोई (वय २४, सध्या रा. बालाजी फर्निचर, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) आणि मुकेश बाबुलाल बिष्णोई (वय १९, रा. दापोडी), अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आपला टेम्पो पिंपळे गुरव येथील नर्मदा गार्डनसमोरील मोकळ्या जागेत दुकानाजवळ पार्क केला होता. या टेम्पोत एक लाख १४ हजार ३७६ रुपये किंमतीची ६८ साखरेची पोती होती. ही पोती चोरीस गेल्याने फिर्यादीने सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. आरोपी जगदीश हा फिर्यादीच्या दुकानात कामगार म्हणून काम करीत होता. कामगार जगदीश हा पोलिसांना स्वतःहून पुढे येत तपासाकरिता मदत करीत होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहण्यास सुरवात केली. या फुटेजमधून एका टेम्पोचा क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यानुसार टेम्पोवाला आरोपी मुकेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. साखरेची पोती आरोपी जगदीश आणि आपण चोरल्याचे आरोपी मुकेश याने पोलिसांना सांगितले.

Web Title: The shop worker was the thief; 68 bags of sugar were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.