पिंपरीत टपरी चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:20 IST2018-05-28T16:20:31+5:302018-05-28T16:20:31+5:30
पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे सोमवारी (दि. २८ मे ) पहाटे टपरी चालकाने आत्महत्या केली.

पिंपरीत टपरी चालकाची आत्महत्या
पिंपरी : पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे सोमवारी (दि. २८ मे ) पहाटे टपरी चालकाने आत्महत्या केली. रमेश ढवळे असे आत्महत्या केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक सुसाईड नोट (चिठ्ठी) आढळून आली आहे. त्या चिट्ठीत मयत टपरी चालकाला त्रास देणाऱ्या काही व्यक्तींचे नावे आहे. त्यामध्ये एका नगरसेवकाच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चिठ्ठीत एका स्थानिक नगरसेवकाचे नाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्या केलेल्या रमेश ढवळे यांनी सुसाइड नोटमध्ये कोणत्या नगरसेवकांचे नाव लिहिले आहे, तो नगरसेवक कोण याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.