गब्बर राजकारण्यांना घरचा रस्ता दाखवा
By admin | Published: February 14, 2017 01:58 AM2017-02-14T01:58:11+5:302017-02-14T01:58:11+5:30
राजकारण करून गब्बर होत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप
वाकड : राजकारण करून गब्बर होत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाकड येथे व्यक्त केले.
आमदार जगताप यांच्या उपस्थितीत प्रभाग २६ चे भाजपाचे उमेदवार ममता गायकवाड, तुषार कामठे, आरती चोंधे व संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ वेणूनगर, वाकड परिसरात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा प्रारंभ जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अभ्यासू आणि समाजाची तळमळ असलेल्या भाजपा उमेदवारांना साथ द्या. विशालनगर-पिंपळे निलख,जगताप डेअरी, वाकड परिसरात विकासकामांची घोडदौड सुरूकरण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले, ‘‘वाकडचा गेल्या २५ वर्षांत जो विकास झाला नाही, तो केवळ या पंचवार्षिकमध्ये झाल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासकामांना जनता न्याय देईल. प्रचार सभेनंतर उदंड प्रतिसादात आमदार जगताप यांच्या उपस्थितीत कावेरीनगर, पोलीस वसाहत, वेणूनगर, वाकड व कस्पटे वस्ती या परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
भाजपाला साथ द्या, विकासाला मत द्या, अशा घोषणांनी वातावरण दणदणून गेले. मोहन कस्पटे, नंदकुमार बालवाडकर, सायबराव थोपटे, सुरेंद्र तांबे, सुरेश इंगवले, संभाजी तांबे, नाना क्षीरसागर, सुभाष काकडे, निखिल कदम, सागर साळुंखे, हृषीकेश दुर्गे, महेश कामठे, प्रसाद कस्पटे यांच्यासह तरुण कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्यने उपस्थित होते. (वार्ताहर)