"लोककलावंतांना जपले पाहिजे..."; पिंपरीत चौघडावादक पाचंगे पिता-पुत्राचा सन्मान
By श्रीनिवास नागे | Updated: August 19, 2023 16:06 IST2023-08-19T16:04:04+5:302023-08-19T16:06:57+5:30
ककलावंतांना जपले पाहिजे. पाचंगे पिता-पुत्र हे निरपेक्ष भावनेने चौघडावादन करतात...

"लोककलावंतांना जपले पाहिजे..."; पिंपरीत चौघडावादक पाचंगे पिता-पुत्राचा सन्मान
पिंपरी : लोककलावंत हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर भारताचे भूषण आहेत. लोककलावंतांना जपले पाहिजे. पाचंगे पिता-पुत्र हे निरपेक्ष भावनेने चौघडावादन करतात. त्यांच्या कार्यक्रमात बहुजन-अभिजन भेद गळून पडला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले.
चौघडावादक दत्तोबा शंकर पाचंगे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि त्यांचे पुत्र रमेश दत्तोबा पाचंगे यांचा एकसष्टीनिमित्त जाहीर नागरिक सत्कार व मानपत्र प्रदान कार्यक्रम पार पडला. यावेळी सबनीस बोलत होते. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते पाचंगे पिता-पुत्राला सन्मानित करण्यात आले. आमदार रवींद्र धंगेकर, पिंपरी-चिंचवड मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ अध्यक्षा अनुराधा राजहंस, माजी आयपीएस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव, कृष्णात महाराज, राघव चैतन्य महाराज आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहत पाचंगे पिता-पुत्राला शुभेच्छा दिल्या.
श्रीपाल सबनीस म्हणाले, दत्तोबा पाचंगे यांच्या चौघडा वादनाने अनेकांना मोहित केले. त्यांचा वारसा त्यांचा पुत्र रमेश याने समर्थपणे पुढे चालवला. या पिता-पुत्राने माणसांची कमाई केली. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला अभिजन-बहुजन भेद गळून सर्व क्षेत्रातील मान्यवर येथे उपस्थित आहेत.
कांदे, बटाटे विक्री करत जपली कला-
सबनीस म्हणाले, दत्तोबा पाचंगे यांनी चौघडा वादन करत होते. तेव्हा त्यातून संसाराचा गाडा हाकेल इतकेही पैसे मिळत नव्हते. त्यामुळे कांदे-बटाटे विक्री करून त्यांनी आपला उदरनिर्वाह करत आपली कला जपली. त्यांचा आदर्श त्यांचा मुलगा रमेश यांनी पुढे चालू ठेवला.
पाचंगे यांनी चौघडा वादनातून आपली एक समर्थ ओळख निर्माण केली आहे. ही मोठी मनाची माणसे आहेत. आपली कला सादर करताना त्या बदल्यात आपल्याला किती मानधन मिळणार याची विचारणा देखील त्यांनी केली आहे. त्यांना पद्मश्री मिळायला हवा. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत.
-डॉ. पी.डी. पाटील, कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ.