शहरवासीयांना बसताहेत चटके
By admin | Published: June 4, 2017 05:24 AM2017-06-04T05:24:56+5:302017-06-04T05:24:56+5:30
शहरातील विविध मंडईत नव्याने भाजीपाला व फळभाज्यांची आवक झाली नाही. त्यामुळे शिल्लक भाज्याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना फिरवे लागत होते. फळभाज्यांचे
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरातील विविध मंडईत नव्याने भाजीपाला व फळभाज्यांची आवक झाली नाही. त्यामुळे शिल्लक भाज्याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना फिरवे लागत होते. फळभाज्यांचे भाव वाढल्याने आणि दूध कुठेही मिळत नसल्याने नागरिकांना संपाच्या धगीचे चटके बसू लागले आहेत.
राज्यातील शेतक-यांनी संप मागे घेण्याविषयी शनिवारी दिवसभर संभ्रम होता. सलग तिस-या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात मोशी व पुण्यातील मार्केटयार्डातून होणारी आवक बंद झाली आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण व निगडी आदी भागातील मंडईतील भाजीपाला गायब झाला आहे. दोन दिवसांपासूनच्या सुकलेल्या फळभाज्या विकण्यावर विक्रत्याचा भर आहे. या फळभाज्या दुप्पट व तिप्पट दराने विकल्या जात आहेत. ग्राहकांनाही मिळेल ती भाजी खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. गल्लोगल्ली फिरणारे भाजीचे गाडे बंद आहेत. शहवासियांना भाजीपालाचा शोध घ्यावा लागत आहे.
- मंडईत भाजीपाला व फळभाज्या मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी पंचायत झाली आहे. त्यामुळे भाज्याऐवजी डाळींना मागणी वाढली आहे. त्यामुळे स्थानिक किराणा दुकानदार डाळी जादा दराने विकून फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकूणच शेतकरी संपाचे थेट चकटे शहरवासियांना बसत आहेत.