रेशीमगाठी

By admin | Published: May 14, 2017 07:03 PM2017-05-14T19:03:09+5:302017-05-14T19:03:09+5:30

याच झाडाशी ती अनेकदा हितगूज करीत असे

Silk thread | रेशीमगाठी

रेशीमगाठी

Next

ऑनलाइन लोकमत

दुपारच्या निवांत वेळी अर्चना अंगणातल्या बहरलेल्या शेवंतीच्या फुलांकडे पाहत विचारात मगA होती. याच झाडाशी ती अनेकदा हितगूज करीत असे, आपले सुख-दु:ख सांगत असे. तिला शेवंतीचं फूल आवडत असल्याने लगA होऊन सासरी गेल्यावरही तिने हे रोप लावले होते. या झाडाच्या फुलव्याप्रमाणे तिचा संसारही फुलत होता. ती, महेश आणि छोटी सोनाली असा सुखाचा संसार सुरू होता. अर्चनाचे शेवंतीवेड महेशला माहीत असल्याने तो ऑफिसमधून येताना न चुकता तिला वेणी आणत असे.
एके दिवशी वाचायला दिलेले पुस्तक घेण्यासाठी गेले असताना, अर्चनाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिचे मन थोडे मोकळे झाल्यावर ती सांगू लागली. आता नाही राहायचे मला इथे, अगदी असह्य झाले आहे. रोजच्या कटकटीचा आता कंटाळा आला आहे. किती दिवस जगायचे असे मनाविरुद्ध. हे ऐकून खर तर धक्काच बसला होता. तिला सांगितले, संसार असा पटकन तोडता येत नाही. तो करत असताना एकाने माघार घ्यावीच लागते. अशी तडजोड केली तरच आनंद निर्माण होऊ शकतो. पण कायमची माहेरी जाण्याच्या निर्णयावर अर्चना ठाम होती. शेवटी ज्याचे प्रश्न त्यालाच सोडवावे लागतात.  घरी आली पण अशी कितीतरी जोडपी डोळ्यासमोर येऊ लागली. वरवर सगळे चांगले दिसत असले, तरी अनेकदा मैत्रिणींच्या गप्पांमधून हे संसाराचं कोड वाढतच जाई आणि मनात विचार येई.
प्रेमविवाह असेल तर ब:याच गोष्टी आधी माहीत असतात. पण ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचे आहे, त्याला फक्त 15-20 मिनिटांत (चहा पोह्यांच्या कार्यक्रमापुरता) पाहायचे, पसंत करायचे, पत्रिका जुळत असेल तर लगA ठरून मुहूर्त ठरवायचा. अशावेळी एकमेकांच्या गुणदोषांसह  स्वीकारलेले असते. लगA झाल्यावर मनासारखे दान पडलं तर ठीक, पण न आवडणारं दान पडूनसुद्धा हिंमत व सबुरीने जगता येते.
आमच्या कॉलनीतील वसुधा अतिशय हुशार. कॉलेजला नेहमी पहिला नंबर, पहिल्याच प्रय}ात उत्तम नोकरी लागली. पती पण चांगले कमवते. पण त्यांनी लगA ठरवतानाच अट घातली, नोकरी केलेली मला चालणार नाही. माङया पगारात उत्तम संसार होईल. लगAानंतर 15 वर्षे मजेत गेले. मुलं मोठी होत होती. पण तिच्या पतीला आजाराने गाठले, प्रचंड पैसा लागला. अशावेळी वसुधाला वाटे आपली नोकरी असती, तर एवढी पैशांची चणचण भासलीच नसती. पण तिने संधी गमावली होती. संसारात असे चढउतार चालूच असतात.
असंच काहीसं उदाहरण केतकीचे. तिचा आवाज उत्तम. शाळेत अनेक बक्षीसं मिळवलेली, पण बायकोनी घरातच राहायचं. बंगला, गाडी नोकर सगळं दिमतीला होत. पण गाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही.

लगAाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. संसार दोन घरे जोडण्यासाठी उभा राहत असतो. दोन घरेच नव्हे तर दोन मनेही या नात्याने, या पवित्र बंधनाने जोडली जातात. सप्तपदीची सात पावले सोबत चालताना आयुष्यभराची साथ निभावण्याचे घेतलेले ते वचन असते. पण याचा विसर पडून छोटय़ा छोटय़ा कारणाने खटके उडू लागतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कुणीही कुणासारखं नसतं. आवड विरुद्ध असते. त्याला भटकंती आवडते, तर तिला घरात राहणेच जास्त आवडते. त्याला मित्रांची आवड, तसेच खूप बोलणे तर हिला कुणीच आलेले आवडत नाही. त्याला मॉडर्न राहण्यात इंटरेस्ट तर हिला एकदम साधी राहणी पसंत असते. असे विजोड वागणे असले तरी संसाराचा गाडा चालू असतो.

20-25 वर्षापूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात खूपच फरक आहे. मुली खूपच शिकलेल्या व कमावत्या असतात, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही उंचावलेल्या असतात. असं असलं तरी नवीन घरात प्रवेश करताना मुलीने हे स्वीकारलेलेच असते की, आता मला फक्त मुलगी किंवा बहीण नाही तर प}ी, सून, मामी, काकू अशा भूमिका वठवाव्या लागणार आहे. पण लगAाआधी आई - वडिलांच्या छत्राखाली मायेने वाढलेल्या या मुलीची अपेक्षा असते फक्त सगळ्यांकडून प्रेमाची, तिला समजून घेण्याची. पण नव:यासकट सगळेच तिच्या विरुद्ध वागू लागले. सतत टोमणे मारू लागले तर काय करावे, हा मोठा प्रश्न तिच्यापुढे असतो. अनेक सुशिक्षित घरात देखील हा प्रकार पाहायला मिळतो.
शेवटी काय तर कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा, 32 गुण जुळले तरी उरलेल्या 4 गुणांशीच लगA होत असतं. आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळणं हा नशिबाचाच भाग असतो. जुळून आलेल्या रेशीमगाठी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. संसारातल्या नाजूक तारा जुळल्या तर सूर कधीच बेसूर होत नाहीत.
- विशाखा देशमुख

Web Title: Silk thread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.