प्राप्तिकर विभागाच्या रडारवर सराफ

By Admin | Published: November 18, 2016 05:05 AM2016-11-18T05:05:46+5:302016-11-18T05:05:46+5:30

केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे ब्लॅक मनी व्हाइट करून देण्यासाठी अनेकांकडून फसवे

Silver on the Radar of Income Tax Department | प्राप्तिकर विभागाच्या रडारवर सराफ

प्राप्तिकर विभागाच्या रडारवर सराफ

googlenewsNext

पिंपरी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे ब्लॅक मनी व्हाइट करून देण्यासाठी अनेकांकडून फसवे आश्वासन व अफवा पसरविल्या जात आहेत. तसेच कर चुकविण्यासाठी काळ्या पैशांचे नियोजन करून देतो, असे सांगून काही ‘सीए’डून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत़ शिवाय सोने व्यापाऱ्यांकडूनही काही लोकांना जादा दराने सोन्याची विक्री करून व्हाइट मनी करण्याचे उद्योग सुरू आहेत़ अशा सर्व गैरप्रकारांवर प्राप्तिकर खात्याचे लक्ष आहे़. लवकरच संबंधितांवर चौकशी कडक कारवाई करणार असल्याची माहिती संयुक्त आयकर आयुक्त अजय डोके यांनी दिली आहे़
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यापासून शहरातील अनेकांकडून काळ्या पैशांचे रूपांतर इतर गुंतवणुकीमध्ये वाढले आहे़ तसेच काही सीए अफ वा पसरून त्यांना गोंधळात टाकत आहेतआणि ते स्वत:चे व्यवसाय वाढवत आहेत़ त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे लक्ष आहे़ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत स्थिर असतानाही शहरातील काही सोने व्यापारी ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी सोन्याचा दर जादा लावत आहेत़ व्यापाऱ्याकडून सोने विक्रीचा योग्य हिशोब न मिळाल्यास त्यांच्यावरही प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल.
करदात्यांना एकाच वेळी कर जमा करता येत नाही, म्हणून प्राप्तिकर विभागाने तीन टप्प्यांत कर भरता यावा, यासाठी कर प्रकटीकरण योजना जाहीर केली होती़ ही योजना १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत सुरू होती़ दरम्यानच्या काळात करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती डोके यांनी दिली़ सध्या केंद्र सरकारने काळ्या पैशांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बंद केल्या आहेत़ त्यामुळे अनेकांची धांदल उडाली आहे़ शहरातील नागरिकांनी गोंधळून न जाता आपला कर भरून घ्यावा, असे आवाहन केले़ काही अडचण असल्यास कार्यालयामार्फत सल्ला व माहिती देण्यात येईल़(प्रतिनिधी)

Web Title: Silver on the Radar of Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.