हल्लाप्रकरणी सहा जण अटकेत
By admin | Published: October 15, 2016 03:13 AM2016-10-15T03:13:00+5:302016-10-15T03:13:00+5:30
कोयते आणि लाकडी दांडक्याचा धाक दाखवून नगरसेविका वैशाली काळभोर यांना एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आणि कार्यालयाची तोडफोड
चिंचवड : कोयते आणि लाकडी दांडक्याचा धाक दाखवून नगरसेविका वैशाली काळभोर यांना एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आणि कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या सहा आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे़ ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सीता निवास इमारतीसमोर वैशाली काळभोर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ काळभोरनगर चिंचवड येथे घडली़
या प्रकरणी आरोपी अशोक रामाचरे (वय ३८, रा़ जय मल्हार, गणेशनगर, चिंचवड), संतोष गेणाजी खंडागळे (वय ३४, रा़ खडीमशिन, चिंचवड), अनिल एकनाथ कांबळे (वय २७), अमर कचरू संमिदर (वय ३०), राजेश मोहन इंगवले (वय २४, तिघेही रा़ अजंठानगर, चिंचवड), दीपक दिलीप कसबे (वय २५, रा़ विठ्ठलनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ न्यायालयात त्यांना हजर केले असता, आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणातील इतर आठ ते दहा आरोपी फरार आहेत़ या प्रकरणी विशाल बाळासाहेब काळभारे
(वय ३३, रा़ सीता निवास, काळभोरनगर, चिंचवड) यांनी
पिंपरी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली आहे़ (वार्ताहर)