सहाशे कोटींना मंजुरी, कचरा प्रकल्पाविषयी विरोधक मूग गिळून गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:24 AM2018-09-29T03:24:43+5:302018-09-29T03:25:02+5:30

गेल्या सव्वा वर्षांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून रामायण सुरू आहे़ कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे सुमारे सहाशे कोटींच्या विषयास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे ऐनवेळी विनाचर्चा मंजुरी देण्यात आली.

Six hundred crores sanctioned, anti-garbage project will be silent | सहाशे कोटींना मंजुरी, कचरा प्रकल्पाविषयी विरोधक मूग गिळून गप्प

सहाशे कोटींना मंजुरी, कचरा प्रकल्पाविषयी विरोधक मूग गिळून गप्प

Next

पिंपरी - गेल्या सव्वा वर्षांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून रामायण सुरू आहे़ कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे सुमारे सहाशे कोटींच्या विषयास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे ऐनवेळी विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. मात्र, यावर राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हे विरोधी पक्ष मूगगिळून बसले होते. यावर आश्चर्य व्यक्त करीत महापालिका वर्तुळात चर्चा होती.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणतीही चर्चा न होता. कचरा संकलनाचा सुमारे ५७० कोटींचा विषय मंजूर करण्यात आला. यावर विरोधकांनी तोंड उघडले नाही, ही आश्चर्याची बाब आहे. तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कचरा संकलन व वाहतूक कामाची वादग्रस्त जुनी निविदा रद्द केल्यानंतर नव्याने निविदा काढण्यासाठी २७ आॅगस्टला एका सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती. त्यानुसार या सल्लागार संस्थेने ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी १३ कोटी १७ लाख, ‘ब’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय १५ कोटी ३० लाख, ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय १० कोटी ९१ लाख आणि ‘ग’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी ११ कोटी ४२ लाख रुपये या प्रमाणे चार निविदा तयार केल्या आहेत.
महापालिकेने या निविदा राज्य सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. या निविदेचा कार्यकाळ आठ वर्षांचा आहे. त्यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च येणार आहे. सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर एकोणीसावा विषय स्वच्छ भारत अभियानाचा विषय होता. या विषयाला उपसूचना देऊन सत्ताधाºयांनी आयत्यावेळी कचरा संकलनाच्या काढलेल्या निविदेस, त्यासाठी पुढील वर्षाकरिता येणाºया कामास मंजुरी घेतली. मात्र, विरोधकांनी एकही सवाल उपस्थित केला नाही.

विरोधकांची संशयास्पद भूमिका
वर्षभर कचºयाचा विषय गाजत असताना कचºयातून सत्ताधारी सोने निर्मिती करीत आहेत का, असा आरोप करणारा विरोधी पक्ष आज मुगगिळून होता. हा विषय मंजूर करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही. चर्चेविना आयत्यावेळी मान्यता दिली. विरोधकांच्या संशयास्पद भूमिकेविषयी महापालिका वर्तुळात चर्चा होती.

Web Title: Six hundred crores sanctioned, anti-garbage project will be silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.