गाडीला ट्रॉली धडकल्याने सहा जखमी
By admin | Published: January 8, 2015 11:15 PM2015-01-08T23:15:58+5:302015-01-08T23:15:58+5:30
दौंड-गोपाळवाडी रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे उद्यानाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीची पीन सटकल्याने रिकामी ट्रॉली मागे येऊन एका खाद्य पदार्थाच्या गाडीला धडकल्याने सहा जण जखमी झाले आहे.
दौंड : दौंड-गोपाळवाडी रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे उद्यानाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीची पीन सटकल्याने रिकामी ट्रॉली मागे येऊन एका खाद्य पदार्थाच्या गाडीला धडकल्याने सहा जण जखमी झाले आहे.
जखमीमध्ये दोन लहान मुली आणि एक मुलाचा सामावेश आहे. ही घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. जर ही घटना सायंकाळी घडली असती, तर मोठा अपघात झाला असता. सालोमन डॅनियल (रा. दौंड), खाद्य पदार्थ विक्रेता (नाव समजू शकले नाही), संगीता झाडे (वय ४५), श्रद्धा झाडे, सोनीया झाडे, संकेत झाडे (सर्व रा. सरस्वतीनगर गोपाळवाडी, दौंड) हे जखमी झाले आहेत. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डबल ट्रॉली लावलेला ट्रॅक्टर भरधाव जात असताना अचानक मागच्या ट्रॉलीची पीन सटकली अन् एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली पुढे गेली आणि पीन सटकलेली ट्रॉली मागे आली आणि खाद्य पदार्थाच्या गाडीला धडकली.
या वेळी वरील सर्व जखमी खाद्य पदार्थ गाडीच्या परिसरातून जात असताना या अपघातात जखमी झाले आहे. अपघात घडताच ट्रॅक्टरचालक पळून गेला, तर परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले.
या परिसरातील रस्ते अरुंद असल्याने त्यातच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर टेप रेकॉर्डर लावून वेगाने पळवात असतात. परिणामी, बऱ्याचदा उसाने भरलेल्या ट्रॉल्या पलटी झालेल्या आहेत. मात्र, नियमबाह्य होणाऱ्या या वाहतुकीकडे आरटीओचे अधिकारी दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.