Pimpri Chinchwad : ताथवडे सिलिंडर स्फोटप्रकरणी दोन एपीआयसह सहा निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 10:06 IST2023-10-10T10:05:31+5:302023-10-10T10:06:24+5:30
पोलीस उपायुक्तांना सखोल चौकशीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत

Pimpri Chinchwad : ताथवडे सिलिंडर स्फोटप्रकरणी दोन एपीआयसह सहा निलंबित
पिंपरी : ताथवडे येथे टँकरमधून गॅस चोरी करताना सिलिंडरचा स्फोट झाला. याप्रकरणी दोन सहायक पोलिस निरीक्षक तसेच चार अंमलदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.
वाकड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक बालाजी ठाकूर व रावेत पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक परवेझ शिकलगार यांना निलंबित करण्यात आले. तसेच वाकड पोलिस ठाण्याच्या चार अंमलदारांना निलंबित करण्यात आले.
तीन आरोपी अटक
सिलिंडर स्फोटप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन आरोपी अटक केले आहेत. तसेच पोलिस उपायुक्तांना सखोल चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. दोन अधिकारी व चार अंमलदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड