ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने झोपलेल्या तरुणाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: January 4, 2025 18:54 IST2025-01-04T18:54:17+5:302025-01-04T18:54:52+5:30
मनोजकुमार सरोज हे सब्बु केम प्रा. लि. कंपनीच्या गेटजवळ झोपले होते.

ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने झोपलेल्या तरुणाचा मृत्यू
पिंपरी : कंपनीच्या गेटवर झोपलेल्या तरुणाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चिखली, कुदळवाडी येथे सब्बू केम प्रा. लि. कंपनीच्या गेटवर गुरुवारी (दि. २) रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मनोजकुमार मणीराम सरोज (३५, रा. कुदळवाडी, चिखली), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. मनोजकुमार यांचे चुलत भाऊ राजेश श्रीगोविंद सरोज (३४, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जयकिसन चित्ररंजन राय (५०, रा. पाटीलनगर, चिखली) याला पोलिसांनी अटक केली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजकुमार सरोज हे सब्बु केम प्रा. लि. कंपनीच्या गेटजवळ झोपले होते. दरम्यान, जयकिसन राय हा त्याच्या ताब्यातील ट्रक मागे घेत होता. त्यावेळी ट्रकचे चाक झोपलेल्या मनोजकुमार यांच्या अंगावरून गेले. यात जखमी झालेल्या मनोजकुमार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल पोलिसांनी जयकिसन याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.