स्मार्ट प्रचाराचा परवडेना खर्च

By admin | Published: February 15, 2017 02:02 AM2017-02-15T02:02:27+5:302017-02-15T02:02:27+5:30

पंचवार्षिक महापालिका निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असून, प्रचारासाठी कालावधीही कमी असल्याने उमेदवारांना

Smart Advertising Expenses | स्मार्ट प्रचाराचा परवडेना खर्च

स्मार्ट प्रचाराचा परवडेना खर्च

Next

रहाटणी : पंचवार्षिक महापालिका निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असून, प्रचारासाठी कालावधीही कमी असल्याने उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचण्यासाठी ह्यस्मार्टह्ण प्रचाराचा फंडा उमेदवारांनी शोधला असला, तरी त्यांना यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याने हा खर्च डोईजड होत आहे. सध्या फेसबुक,व्हॉट्स अप साइटवर दिवसाला हजारो कॉमेंट्स पडत आहेत. तर व्हॉटस अपच्या ग्रुपवर याहीपेक्षा जास्त पोस्ट पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पैसे खर्च करून उमेदवार हातघाईला आले आहेत, तर पोस्ट वाचून मतदार हैराण झाले आहेत.
मतदारांची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाजवळ पोहोचणे कदापि शक्य नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात उमेदवारांनी संगणकीकृत प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. संबंधितांकडून इंटरनेटचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शहरातील व शहराबाहेरील शेकडो सोशल मीडिया चालविणाऱ्या कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. या कंपन्यांकडून मतदारांच्या संख्येनुसार दर निश्चित करून पॅकेज आकारले जात आहे. (वार्ताहर)
व्हॉट्स अप पोस्ट नको
४तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने जगाशी जोडलेले राहावे, ही काळाची गरज आहे. मात्र याचा त्रास निवडणुकीच्या काळात नकोसा झाला आहे. आपल्याला कोणीच ओळखत नाही अशा ग्रुपमध्ये आपला मोबाइल क्रमांक समाविष्ट केला जातो व एक ना अनेक पोस्ट मनात नसतानाही वाचाव्या लागत असतात. कोणती माहिती कधी मिळेल याचा भरवसा नसल्याने त्या ग्रुपमधून बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.
लाइव्ह व्हिडीओ संकल्पना
४सध्या निवडणुकीच्या हंगामात ‘फेसबुक लाइव्ह’ ही संकल्पना सर्वांत जास्त लोकप्रिय ठरत आहे. संबंधित उमेदवाराकडून फेसबुक लाईव्ह पर्याय निवडून त्या आधारे स्वत:ची चित्रफीत संबंधित प्रभागातील तरुणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यासाठी स्वतंत्र टेक्नोसेव्ह युवकांची नियुक्ती उमेदवारांकडून करण्यात आली आहे. या कामासाठी त्या कामाचाही पगार मोठ्या प्रमाणात द्यावा लागत आहे.
व्हाईस रेकॉर्डिंगची डोकेदुखी
४सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हायटेक प्रचार यंत्रणेवर सर्वच उमेदवारांनी भर दिला आहे,मात्र याचा कोणाला त्रास होतोय काय,याचा विचारही कोणाच्या मणात येतो कि नाही देव जाणे मात्र सध्या व्हॉट्सअप, फेसबुक बरोबरच व्हाईस रेकॉर्डिंगलाही फार महत्व आले आहे . उमेदवाराच्या आवाजात हे रेकॉर्डिंग करण्यात येत आहे .

Web Title: Smart Advertising Expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.