‘स्मार्ट सिटी’ आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:21 AM2019-03-15T03:21:28+5:302019-03-15T03:21:40+5:30

स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती-तंत्रज्ञान, संगणक प्रणालीच्या कामकाजाकरिता आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

'Smart City' Appoints Eight Officials | ‘स्मार्ट सिटी’ आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

‘स्मार्ट सिटी’ आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next

पिंपरी : स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती-तंत्रज्ञान, संगणक प्रणालीच्या कामकाजाकरिता आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, कॉम्प्युटर प्रोग्रामर, आॅपरेटर यांचा समावेश असणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

पिंपरी-चिंचवड माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत जेएनएनयुआरएम, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना तसेच कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेल, सिटी ट्रान्सफॉर्मेशन आॅफिस, अमृत योजना आदी विविध योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्यासाठी या कामकाजासाठी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी स्मार्ट सिटी सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माहिती व तंत्रज्ञान-संगणक प्रणालीविषयक कामकाजासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.

स्मार्ट सिटी सेल : अतिरिक्त पदभार सोपविला
महापालिकेतील माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, श्रीधर पवार, अनिता कोटलवार, कॉम्प्युटर प्रोग्रामर संजय जाधव, दीपक पवार, उज्ज्वला गोडसे, कॉम्प्युटर आॅपरेटर रामहरी रासकर आणि सचिन राणे यांच्याकडे स्मार्ट सिटी सेलचा तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या अधिकारी, कर्मचाºयांना त्यांच्याकडे यापूर्वी सोपविलेले सर्व कामकाज सांभाळून स्मार्ट सिटीचे माहिती व तंत्रज्ञान-संगणक प्रणालीविषयक कामकाज करायचे आहे. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजाचे नियोजन व वाटप करावे लागणार आहे.

Web Title: 'Smart City' Appoints Eight Officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.