स्मार्ट सिटीने थकविलेले वीजबिल पालिका भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:18 IST2025-02-12T09:17:26+5:302025-02-12T09:18:23+5:30

नवीन वीज मीटर न देण्याचा महावितरणने घेतला पवित्रा; कॅमेऱ्याचा पुरवठा तोडला

Smart City will pay the municipality's electricity bills | स्मार्ट सिटीने थकविलेले वीजबिल पालिका भरणार

स्मार्ट सिटीने थकविलेले वीजबिल पालिका भरणार

पिंपरी : शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवडस्मार्ट सिटी लिमिटेडने निगडी येथे सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर सुरू केले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे या सेंटरला जोडले आहेत. सेंटर व कॅमेऱ्यासाठी स्वतंत्रपणे वीजजोड घेण्यात आले आहेत. वीजबिल न भरल्याने कॅमेऱ्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने तोडण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी भरल्याशिवाय महापालिकेस नवीन वीज मीटर दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा महावितरणने घेतला आहे. ते थकीत बिल महापालिका स्वतः भरणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच, कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने शहरभरात ५ हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उभे केले आहेत. कॅमेऱ्यासाठी वीजजोड घेण्यात आले आहेत. त्याला स्वतंत्रपणे महावितरणचे मीटर लावण्यात आले आहेत, ती वीजजोडणी स्मार्ट ५ सिटी कंपनीचे ठेकेदार क्रिस्टल तसेच, स्मार्ट सिटीने घेतले होते. या वीजपुरवठ्याचे बिल संबंधित ठेकेदार क्रिस्टलने भरणे बंधनकारक आहे.

ठेकेदाराने बिल का भरले नाही?  
थकीत बिल भरून ते ठेकेदार क्रिस्टल किंवा स्मार्ट सिटी कंपनीच्या बिलातून वसूल करण्यात येणार आहे. वीजबिल भरणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदारांनी ते भरले नाही. महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी झाली आहे. असे असताना मुजोर ठेकेदारांवर कोणताही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील नागरिकांमधून होत आहे.  

Web Title: Smart City will pay the municipality's electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.