सोशल चेस बुद्धिबळ : मोने, भोईर, बोगावत विजेते,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:41 AM2018-01-01T04:41:55+5:302018-01-01T04:42:08+5:30

सोशल चेस लीग स्पर्धेत वेद मोने, सोहम भोईर, प्रणव बोगावत, श्रावणी उंडाळे आणि कुशाग्र जैन यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.

 Social chess chess: Mona, Bhoir, Bogat winners, | सोशल चेस बुद्धिबळ : मोने, भोईर, बोगावत विजेते,

सोशल चेस बुद्धिबळ : मोने, भोईर, बोगावत विजेते,

Next

पिंपरी : सोशल चेस लीग स्पर्धेत वेद मोने, सोहम भोईर, प्रणव बोगावत, श्रावणी उंडाळे आणि कुशाग्र जैन यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
स्पोटर््स रिपब्लिक, निगडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात करण्यात आले होते.
१७ वर्षांखालील गटात वेद मोने याने पाचही फेºया जिंकत पाच गुणांसह विजेतेपद मिळविले. क्षितीज कर्ण चार गुणांसह या गटात उपविजेता ठरला. ओम लामकाने, प्रतीक मेहता, वैभव कदम, सुदर्शन अय्यर, मानसी ठाणेकर, श्रेयांश शिंगवी, संस्कृती पाटील, प्रज्ञेश इंगोले यांनी अनुक्रमे तीन ते दहावा क्रमांक मिळविला.
१३ वर्षांखालील गटात सोहम भोईर विजेता ठरला. त्याने सात फेºयांमध्ये साडेसहा गुणांची कमाई केली. प्रतीक बिक्कड, स्वराज देव, सर्वेश सावंत, श्रीनिवास कुलकर्णी, रितेश शेलार, आयुष मारभळ, कुंज बन्सल, अमोघ कुलकर्णी, श्री पाटील यांनी गुण आणि टायब्रेक गुणांच्या आधारे अनुक्रमे दोन ते दहावा क्रमांक मिळविला.
११ वर्षांखालील गटात प्रणव बोगावत सात फेºयांमध्ये साडेसहा गुण जिंकत विजेता ठरला. रिषभ जठारने सहा गुणांसह उपविजेतेपद मिळविले. शौर्य हेर्लेकर, ज्योतिरादित्य देशपांडे, संजय नाईक, ऐश्वर्या अभ्यंकर, ओम शिंदे, पलाश रायतूरकर, असीम गोडबोले, लाव्या मेनन हे गुण आणि टायब्रेकच्या आधारे अनुक्रमे तीन ते दहा क्रमाकांचे मानकरी ठरले.
पारितोषिक वितरण ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडीचे उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक सदाशिव गोडसे यांच्या हस्ते झाले. यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके आणि पदके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक स्पोटर््स रिपब्लिकचे संचालक श्रीराम कुंटे यांनी केले. आभार ओमप्रकाश तिवारी यांनी मानले.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून इंटरनॅशनल आॅर्बिटर नितीन शेणवी यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पंच म्हणून विकास देशपांडे, सदाशिव गोडसे, गुरुनाथ कुलकर्णी, मानसी देशपांडे, शुभम चतुर्वेदी यांनी सहकार्य केले.

९ वर्षे वयोगट : टायब्रेकरवर निर्णय

नऊ वर्षांखालील गटात श्रावणी उंडाळे, अंशुल बसवंती, आर्य पाटील
आणि मानसी तावरी यांचे सहा फेºयांत समान पाच गुण झाले होते.
टायब्रेकर गुणांनुसार श्रावणीला विजेतेपद, तर अंशुलला उपविजेतेपद
मिळाले. आर्य आणि मानसला अनुक्रमे तिसºया आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पूर्वा होले, ललितादित्य नदार, आर्यन गांधी, शंतनू गायकवाड, जयम मारभळ, दीपांशू लोखंडे यांनी अनुक्रमे पाचवा ते दहावा क्रमांक मिळविला.
सात वर्षांखालील गटात कुशाग्र जैनने सहा फेºयांमध्ये साडेपाच गुण मिळवीत विजेतेपद, तर हितांश जैनने पाच गुणांसह उपविजेतेपद पटकाविले. अर्जुन राजे, अपेक्षा मारभळ, युवराज पाटील, रोहन लागू, आर्यन राव, नोअमान पाचवडकर, सोहम जठार, अनिश रावते यांनी अनुक्रमे तिसरा ते दहावा क्रमांक मिळविला.

Web Title:  Social chess chess: Mona, Bhoir, Bogat winners,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.