पाळीव श्वानाला क्रूरपणे मारणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक, वाकड ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:52 PM2017-11-24T12:52:32+5:302017-11-24T12:53:17+5:30
पाळीव श्वानाला पकडून त्याला बेदम मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर अज्ञातस्थळी सोडणाऱ्या सुरक्षारक्षकावर वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड - पाळीव श्वानाला पकडून त्याला बेदम मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर अज्ञातस्थळी सोडणाऱ्या सुरक्षारक्षकावर वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि २२) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
दीपक सूर्यभान आचार्य (वय ४१, रा. गणेशनगर, थेरगाव) असं सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. पाळीव श्वानाला मारहाण केल्याची तक्रार अनुपा अतुल गाडे (वय ४७, रा. द ऊड्स सोसायटी वाकड) यांनी वाकड ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पाळीव प्राणी संरक्षण कायदा १९६० चा अधिनियम कलम ११ (क) (१) आयपीसी ४२९,एमपी ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याबाबत उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेली माहिती अशी, आरोपी हा या सोसायटीत सुरक्षा रक्षकाचं काम करतो. त्याने येथील एका कुत्र्यास पकडून त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन लाकडी दांडक्याने क्रूरतेने मारहाण करून बेशुद्ध पाडलं आणि नंतर त्याला पोत्यात भरून अज्ञात ठिकाणी सोडून दिलं. हा प्रकार तक्रारदाराने पाहिल्यानंतर कुत्र्याला परत आणून त्याच्यावर उपचार केले.