सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा, महापालिकेत बैठक, संघटनांची कार्यवाही करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:22 AM2017-12-12T04:22:02+5:302017-12-12T04:22:16+5:30
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवारीआढावा बैठक घेतली. बैठकीत सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
पिंपरी : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवारीआढावा
बैठक घेतली. बैठकीत सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता देवाअण्णा गट्टुवार, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रमेश वस्ते, सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सफाई मजदूर काँग्रेस शहर अध्यक्ष संतोषकुमार नायडू, उपाध्यक्ष
प्रेमचंद चनाल, राजू परदेशी, कार्याध्यक्ष राजू खैरे, सरचिटणीस दिलीप मोटा, अॅन्थोनी बनसोडे, राजेश टक्कले, सुरेश जाधव, रमेश विटकर, बबन छजलाने, रेखा सरपटा, शांताराम बाल्मिकी, अजय चव्हाण, भारत आवडे आदी उपस्थित होते. बैठकीत मांडलेल्या विविध समस्यांबाबत लवकर कार्यवाही करणेबाबत डॉ. सुधाकरन पणीकर यांनी मागणी केली. तसेच महापालिकेने सफाई कर्मचाºयांसंबंधी केलेल्या इतर कामांबाबत समाधान व्यक्त केले.
या बैठकीत लाड समितीच्या शिफारसीनुसार मिळणाºया सुविधा व त्यांची अंमलबजावणीबाबत, सफाई कामगारांची रिक्त पदे भरणेबाबत, सफाई कर्मचारी यांना शासकीय सुटीच्या दिवशी काम केल्याबद्दल दीडपट वेतन अदा करणेबाबत, सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला व दुसरा लाभ मंजूर करताना शैक्षणिक अर्हता व जात पडताळणी अट शिथिल करणेबाबत, सफाई कर्मचारी यांना घरे बांधून देणेबाबत, वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांना शनिवारच्या दिवशीचे कामकाज वेळेबाबत, आजारी असलेल्या कर्मचारी यांचे बदलीबाबत, सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याबाबत तसेच तदअनुषंगिक महापालिकेतील सफाई कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.