कधीतरी असंही...एकपात्री प्रयोग आणि सादरकर्ते पिंपरीचे आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 07:03 PM2018-10-12T19:03:37+5:302018-10-12T19:04:29+5:30
महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा होता .
पिंपरी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणाला नेहमी लगाम घालणाऱ्या संयत, शांत स्वभावाचे आणि कोणत्याही प्रश्नावरून चौकशीचे आदेश देण्यात पटाईत असणाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चक्क चिनी के दाम कम करने हमे वोट दे... हा एकपात्री अभिनय अविष्कार सादर केला. त्यास उपस्थितांनी दाद दिली. तसेच महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा धक्का होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेविषयीचा कोणताही प्रश्न आयुक्त हार्डीकर यांना प्रश्न विचारला की ते आपल्या रसाळवाणीने समोर असणाऱ्यांचे तोंड गप्प करतात. एवढे वाक्चातुर्य त्यांच्याकडे आहे. नेहमी धीरगंभीर, कधी हसमुख पण अत्यंत शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख आहे.
भोसरीत महापालिकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी व्यासपीठावर महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते. त्यावेळी आयुक्तांमधील कलावंत शहरवासियांसमोर पुढे आला.
संयोजकांनी आयुक्तांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी एकपात्री कलाविष्कार सादर केला. नमस्कार, भाईयो और बहनों, काका और काकिंयो, दादा और दादियो, अशी आयुक्तांनी सुरूवात केली. आता ते काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. ते म्हणाले, आजकल हमारे देश में महंगाई बहोत बढ गई है. इसका प्रमुख कारण हे लोकसभा. वैसे जडो मे जड खरबुजे के जड बडी होती है. और रंगो मे रंग जर्मनी के रंग पक्के होते. वह जर्मनी की पहले दुसरे वर्ल्ड वॉर मे शामिल हुई थी. अक्सर वार तो बहुत होते. जैसे की, सोमवार- मंगलवार- बुधवार. शनिवार तो हनुमान जी का वार होता है. वह हनुमानजी की उन्होंने हिमालय से संजीवनी बुटी लाई थी. (हात उंचावून) तो बोलो जय श्री हनुमान. जो हिमालय, उसके एक और भारत दुसरी और चीन. चीन मे रहेने वालोंको चिनी कहॉ जाता है. यदी आप चीनी के दाम कम करना चाहते हे, तो कृपा करके हमे वोट दो. यावर उपस्थितांमध्ये हास्य लाट उसळली. सर्वांनी आयुक्तांच्या कलाविष्कारास दाद दिली. महापालिकेच्या कार्यक्रमात सनदी अधिकाऱ्यांतील, आयुक्तांमधील एक अभिजात कलावंत चिंचवडकरांना अनुभवयाला मिळाला.