Pune Crime : धक्कादायक! कामावर का जात नाही, असे विचारल्याने मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:39 PM2023-03-23T20:39:49+5:302023-03-23T20:40:02+5:30

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलाला अटक केली...

son killed the birth mother by asking why she was not going to work pune latest news | Pune Crime : धक्कादायक! कामावर का जात नाही, असे विचारल्याने मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

Pune Crime : धक्कादायक! कामावर का जात नाही, असे विचारल्याने मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

googlenewsNext

पिंपरी : कामावर का जात नाही, अशी विचारणा महिलेने तिच्या मुलाला केली. याचा राग आल्याने मद्यपी मुलाने सिमेंटचा गट्टू महिलेच्या डोक्यात मारला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. हा प्रकार ९ मार्च रोजी निराधारनगर, पिंपरी येथे घडला.

परेगाबाई अशोक शिंदे (वय ५८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्वास अशोक शिंदे (वय ३०, रा. निराधानगर, पिंपरी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परेगाबाई यांचा मुलगा विश्वास हा कचऱ्याच्या घंटागाडीवर मजूर म्हणून काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्वास हा २०१५ पासून चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. जेलमधून सुटल्यानंतर विश्वास दारूच्या आहारी गेला होता. नशेत तो विनाकारण त्याची आई परेगाबाई हिच्याशी भांडणतंटा करायचा. परेगाबाई या कचरा गोळा करण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.

दरम्यान, ९ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास दारूच्या नशेत झोपलेल्या विश्वासला उठविण्याचा प्रयत्न परेगाबाई यांनी केला. यावेळी कामावर का जात नाही, अशी विचारणा परेगाबाईने केली. त्याचा राग आल्याने विश्वासने परेगाबाई यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) मारला. त्यामुळे ती जीव वाचविण्यासाठी पळत सुटली. विश्वास याने तिचा पाठलाग केला. त्यावेळी परेगाबाई पायात पाय अडकून पडली. तिचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. त्यावेळी विश्वास निघून गेला. परेगाबाई व विश्वास यांच्यातील भांडणाबाबत शेजारच्यांना माहिती होते. परंतु, ती पाय घसरून पडून गंभीर जखमी झाली, असा समज होता. परेगाबाई यांना त्यांच्या मुलीने तळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारादरम्यान परेगाबाईचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तपास सुरू केला. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर विश्वास शिंदे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शिवानंद स्वामी, पोलिस कर्मचारी दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उद्धव खेडकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: son killed the birth mother by asking why she was not going to work pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.