शिक्षण सभापतिपदी सोनाली गव्हाणे, उपसभापतिपदी शर्मिला बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:28 AM2018-07-10T02:28:45+5:302018-07-10T02:28:48+5:30

महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपाच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळाला आहे.

 Sonali Gavane as Education Chairman, Sharmila Babar as Sub-Chairperson | शिक्षण सभापतिपदी सोनाली गव्हाणे, उपसभापतिपदी शर्मिला बाबर

शिक्षण सभापतिपदी सोनाली गव्हाणे, उपसभापतिपदी शर्मिला बाबर

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपाच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळाला आहे. सभापतिपदी गव्हाणे यांची व उपसभापतिपदी भाजपाच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड सोमवारी झाली.
सोमवारी शिक्षण मंडळ सभापती व उपसभापतिपदासाठी महापालिकेत निवडणूक झाली. सभापतिपदासाठी प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतिपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी जाहीर केले. महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती गव्हाणे आणि उपसभापती बाबर यांचा सत्कार झाला.
नव्या शिक्षण समितीचे सदस्य
भाजपाकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची नुकत्याच झालेल्या महासभेत शिक्षण समितीत निवड करण्यात आली होती.

Web Title:  Sonali Gavane as Education Chairman, Sharmila Babar as Sub-Chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.