दक्षिण प्रवेशद्वार वाहतूक समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:14 AM2018-03-30T03:14:50+5:302018-03-30T03:14:50+5:30

पिंपरी-चिंचवड शहराचे दक्षिण दिशेला असलेला हिंजवडी-वाकड परिसर आयटीपार्कच्या वर्दळीमुळे कायमच वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेला असतो

Southern entrance traffic problems | दक्षिण प्रवेशद्वार वाहतूक समस्यांच्या गर्तेत

दक्षिण प्रवेशद्वार वाहतूक समस्यांच्या गर्तेत

Next

हिंजवडी : पिंपरी-चिंचवड शहराचे दक्षिण दिशेला असलेला हिंजवडी-वाकड परिसर आयटीपार्कच्या वर्दळीमुळे कायमच वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेला असतो. येथील वाढते शहरीकरण, शैक्षणिक संस्था, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, वाहनांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ आणि त्या तुलनेत तोकडी व्यवस्था यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणा-या मार्गावर वेळीच उपाययोजना न केल्यास वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होणार आहे.
हिंजवडी परिसरात आयटीपार्कमुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या आयटीपार्कमध्ये तीन लाख कर्मचारी काम करत आहेत. यासाठी खासगी व सार्वजनिक अशा जवळपास तीन हजार बसेस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. परिसरातील रस्त्यावर रोज किमान एक लाखांपेक्षा अधिक चारचाकी वाहने धावतात. लाखोंच्या संख्येत दुचाकीस्वार आहेत. पुढील दोन वर्षांत दीड लाख कर्मचाऱ्यांची भर आयटीपार्कमध्ये पडणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी अधिक सक्षम पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. आयटी पार्कसाठी सहा रस्ते दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले आहेत. त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु सध्या केवळ दोन रस्ते खुले आहेत. दोन्ही रस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जातात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात येणाºया रस्त्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.
सांगवी, पिंपळे-निलख, वाकड, थेरगाव परिसरातही वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यातही नियोजनबद्ध वाहतूक असल्यास काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागतो. वाहतूक विभागाने सुरू केलेली बस लेनमुळे बस वेळेत पोहोचतात. अलीकडे या बस लेनहून दुचाकीस्वार जाताना दिसतात. यामुळे परिस्थिती अधिक कठीण होते. आयटी कंपन्यांच्या एचआयए संस्थेतील कंपन्यांनी कामाच्या वेळेत बदल केल्याने काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होताना दिसत आहे.

Web Title: Southern entrance traffic problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.