सभापती निवडी बिनविरोध

By admin | Published: January 24, 2017 02:05 AM2017-01-24T02:05:03+5:302017-01-24T02:05:03+5:30

नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. तहसीलदार

Speaker selection uncontested | सभापती निवडी बिनविरोध

सभापती निवडी बिनविरोध

Next

लोणावळा : नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी सचिन पवार यांनी काम पाहिले.
नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी व कॉँग्रेस अशी युती असल्याने पाच विषय समित्यांपैकी पाणीपुरवठा, महिला बालकल्याण व शिक्षण या तीन समित्यांचे सभापतिपद भाजपाला, तर सार्वजनिक बांधकाम व आरोग्य या दोन विषय समित्यांचे सभापतिपद कॉँग्रेसला मिळाले. या व्यतिरिक्त पदसिद्ध असलेले स्थायी व नियोजन ही दोन्ही सभापतिपदे भाजपाला मिळाली.
स्थायी समितीचे सभापतिपद हे नगराध्यक्षांसाठी पदसिद्ध असल्याने सुरेखा जाधव यांची सभापतिपदी निवड झाली. सर्व समित्यांचे सभापती स्थायीचे सदस्य असून, इतर तीन सदस्यांमध्ये देविदास कडू, सुनील इंगुळकर व संजय घोणे यांची वर्णी लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम समिती : आरोही तळेगांवकर (सभापती), जयश्री आहेर, गौरी मावकर, बिंद्रा गणात्रा, सुवर्णा अकोलकर, शिवदास पिल्ले, शादान चौधरी व सेजल परमार (सदस्य).
शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य : अपर्णा बुटाला (सभापती) गौरी मावकर, बिंद्रा गणात्रा, सुधिर शिर्के, संध्या खंडेलवाल, सुनिल इंगूळकर, कल्पना आखाडे, मंदा सोनवणे (सदस्य).
स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य : पुजा गायकवाड (सभापती) देविदास कडू, बिंद्रा गणात्रा, जयश्री आहेर, निखिल कविश्वर, शिवदास पिल्ले, नितिन आगरवाल, अंजना कडू (सदस्य).
पाणीपुरवठा व जलनिस्सारण : भरत हारपुडे (सभापती) जयश्री आहेर, बिंद्रा गणात्रा, सुधिर शिर्के, संजय घोणे, माणिक मराठे, सिंधू परदेशी, अंजना कडू (सदस्य).
नियोजन व विकास : श्रीधर पुजारी (पदसिद्ध सभापती) गौरी मावकर, जयश्री आहेर, निखिल कविश्वर, सुधिर शिर्के, माणिक मराठे, शादान चौधरी, मंदा सोनवणे (सदस्य).
महिला व बालकल्याण समिती : रचना सिनकर (सभापती), जयश्री आहेर (उपसभापती) बिंद्रा गणात्रा, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे व सेजल परमार (सदस्य). (वार्ताहर)

Web Title: Speaker selection uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.