मोबाईलवर बोलणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:00 AM2018-05-10T03:00:40+5:302018-05-10T03:00:40+5:30
वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत थांबून मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने काढून घेतले. काही वाहनचालकांकडून दंड वसुली केली.
पिंपरी : वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत थांबून मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने काढून घेतले. काही वाहनचालकांकडून दंड वसुली केली.
वेळोवेळी वाहनचालकांना सांगूनही त्यांच्यात सुधारणा घडून येत नाही. मागील आठवड्यात वाहतूक नियमांचे योग्य प्रकारे पालन करणाºया वाहनचालकांना थांबवून वाहतूक पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. हेल्मेट आहे, सिग्नलला थांबतात, अशा वाहन चालकांच्या दुचाकींना वाहतूक पोलिसांनी स्वत: स्टिकर लावले. वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा असा संदेश पोलिसांनी दिला. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाºया वाहनचालकांना थांबवून अशा प्रकारे मोबाईलवर बोलत वाहन चालविणे धोकादायक ठरू शकते. अपघातास निमंत्रण देऊन जिवावर बेतणारे ठरू शकते. असे सांगूनही राजरोसपणे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम दोन दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने हाती घेतली.
या मोहिमेत १५ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. वाहतूक विभाग पोलीस उपायुुक्त कार्यालयाकडे हे परवाने पाठविण्यात आले असून त्यांच्यामार्फत हे परवाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठविले जातात. आरटीओ कार्यालयाकडून असे परवाने रद्द
होऊ शकतात. मोबाईलवर
बोलत वाहन चालविणाºयांना तत्काळ २०० रूपये दंड केला जातो. अशी दंडाची रक्कमही अनेक वाहन चालकांकडून वसूल करण्यात आली आहे.