अनधिकृत बांधकामांना वेग

By admin | Published: January 25, 2017 02:00 AM2017-01-25T02:00:26+5:302017-01-25T02:00:26+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन निवडणूकप्रक्रियेत व्यग्र असताना शहरातील सर्वच भागात अनधिकृत बांधकामे फोफावली

The speed of unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांना वेग

अनधिकृत बांधकामांना वेग

Next

रावेत : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन निवडणूकप्रक्रियेत व्यग्र असताना शहरातील सर्वच भागात अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत.
विशेषत: भोसरी, च-होली, दिघी, मोशी, कृष्णानगर, संभाजीनगर, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी या भागात बिनधास्तपणे अशी बांधकामे आजही सुरू आहेत. त्यामुळे अगोदरच्या अनधिकृत बांधकामात आणखी भर पडली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात दहा ते पंधरा वर्षांपूर्वी फक्त ४० हजार गुंठेवारीची बांधकामे होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार काही वर्षांपूर्वी दंडात्मक कारवाईने त्यातील अर्धी बांधकामे नियमित करण्यात आली. आरक्षित अथवा रस्त्याच्या जागेवर असल्याने गुंठेवारीच्या अर्ध्या अधिक बांधकामांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
महापालिका प्रशासनाला शहरात कुठे कुठे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत हे माहीत असूनही कारवाई होत नसल्याने अशी बांधकामे करणाऱ्यांचे धाडस वाढले. बहुतेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अशी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे गेल्या दहा-पंधरा वर्षांत प्राधिकरण आणि महापालिका क्षेत्रात मिळून सुमारे लाख ते दीड लाख अनधिकृत बांधकामे वाढल्याचा अंदाज आहे.
काळेवाडी, थेरगाव, गणेशनगर, कस्पटेवस्ती, वाकड रस्ता या भागातसुद्धा अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: The speed of unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.