अवास्तव खर्चाला मंडळांनी दिला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:31 AM2018-09-19T02:31:49+5:302018-09-19T02:32:06+5:30

साधेपणाने उत्सव, अनाथालयाला मदत, अन्नदानाचा उपक्रम

Spell out unrealistic expenses by the boards | अवास्तव खर्चाला मंडळांनी दिला फाटा

अवास्तव खर्चाला मंडळांनी दिला फाटा

Next

दिघी : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अवास्तव खर्च टाळून श्रींच्या आकर्षक मूर्तीवर जास्त भर दिला आहे. मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आयोजित करून उत्सवाची रंगत वाढली आहे. साधेपणात उत्सव साजरा करीत बचत झालेल्या रकमेमधून अनाथालयाला अन्नदान, वृक्षारोपण करून सामाजिक भान जपत मंडळाची परंपरा जोपासली आहे.

दिघीतील सर्वांत जुने मंडळ अमर मित्र मंडळ ४२वे वर्ष साजरे करीत आहे. श्रींच्या मूर्तीला चांदीचा मुकुट व आभूषणे परिधान करून सजविण्यात आले आहे. दर वर्षी देखाव्यातून भक्तांना आकर्षित करणाऱ्या या मंडळाने साधेपणाने उत्सव करीत सामाजिक उपक्रमांवर जास्त भर दिला आहे.
मंडळाने मोबाइल अतिवापराचे दुष्परिणाम या सामाजिक विषयावर पथनाट्य आयोजित केले आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, मार्गदर्शक संजय गायकवाड, अध्यक्ष सागर कदम, सचिव रवि गायकवाड यांच्यासह अजय वाळके, विनोद साकरे, अमोल विठूबोने, निखिल राठोड, उदय गायकवाड, किशोर गायकवाड कार्यरत आहेत.
आदर्श मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी मंदिराची प्रतिकृती उभारून आकर्षक रोषणाई करून आरास सजवली आहे. मंडळाचे अध्यक्ष सतीश वाळके, कुलदीप वाळके, रवींद्र वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, किशोर गोडसे, बालाजी कोलते, सचिन येरवंडे, सुधाकर भोसले,विकास परांडे, सचिन वाळके, मयुर जगदाळे अशा युवा कार्यकर्त्यांची फळी नेहमीच मंडळाच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असते. मंडळाचे ४० वे वर्ष आहे.
दिघी गावठाणातील सुयोग संयुक्त नवभारत मित्र मंडळाचे २६वे वर्ष आहे. मंडळाने फुलांची सजावट करून सिंहासनावर विराजमान अशी मनमोहक स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष किशोर सावंत असून मच्छिंद्र परांडे, स्वप्निल कुंभार, विनायक रेड्डी, भानुदास वाळके, मनोज वाघ, राहुल माने, रामदास डोंगरे, सचिन वाळके सदस्य आहेत.
झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गावर प्रेम करा असा संदेश देत परिसरातील दत्तगडावर वृक्षारोपण करून हिंदवी स्वराज्य मित्र मंडळाने झाडांच्या रोपांतून गणरायाची आरास केली आहे. मुलांसाठी, महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात मंडळाचा हातखंडा आहे. मंडळाचे १४ वे वर्ष असून, अध्यक्ष विकास गिरमे, दीपक कुलकर्णी, जे डी कांबळे, शिवरत्न समुद्रे सहभागी झाले आहेत.
दिघी गावठाणातील श्री गणेश तरुण मित्र मंडळ ३८ वे वर्ष साजरे करीत आहे.
या वर्षी मंडळाने आकर्षक संगीत तालावरील दिव्यांची रोषणाई केली आहे. मंदिराची प्रतिकृती साकारत विविध रंगांच्या छटांनी गणरायाची मूर्ती लक्ष वेधून घेत आहे. सजावट पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत. सामाजिक उपक्रम राबवीत अन्नदान, अनाथालयात शालेय साहित्य वाटप मंडळाकडून करण्यात येते. मंडळाचे अध्यक्ष केशव मोरे, उपाध्यक्ष कुणाल वाळके, खजिनदार किरण डाबी मंडळाच्या विविध पदांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात. दरम्यान शहरातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Web Title: Spell out unrealistic expenses by the boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.