सोसायटींमधील मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग

By admin | Published: February 22, 2017 02:34 AM2017-02-22T02:34:57+5:302017-02-22T02:34:57+5:30

पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी रहाटणी,पिंपळे सौदागर,वाकड, पिंपळे गुरव पिंपळे निलख यासह पिंपरी-

Spontaneous participation of voters in societies | सोसायटींमधील मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग

सोसायटींमधील मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग

Next

रहाटणी : पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी रहाटणी,पिंपळे सौदागर,वाकड, पिंपळे गुरव पिंपळे निलख यासह पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू सोसायटीमधील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले.
पिंपरी-चिंचवड शहरातील काही प्रभागांत गावठाणापेक्षा सोसायटीमधील मतदानाचे निर्णायक ठरणार असल्याने काही प्रभागातील निकालाकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.
सोसायटीमधील इच्छुकांना सर्वच पक्षांनी किमान दोघांना उमेदवारी द्यावी म्हणून आग्रह केला होता. मात्र काही राजकीय पक्षांनी काहींना उमेदवारी दिली, तर काहींनी दिली नाही म्हणून सोसायटीच्या अस्तित्वासाठी सोसायटीमधील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील सोसायटीमधील मतदारांनी अगदी सकाळपासूनच मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या.
या सोसायटीमधील बहुतांश नागरिक हे हिंजवडी येथील आयटीमध्ये कामास असल्याने अनेकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला, तर महिला दुपारी अकरानंतर मतदान केंद्रावर आल्या. यंदा अगदी घराच्या जवळच मतदान केंद्र दिल्याने मतदार घराबाहेर पडला. या परिसरात अनेक मोठ्या सोसायटीमध्ये मतदान केंद्र सुरु केल्याने सोसायटीधारक मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे चित्र दिसून येत होते. हीच परिस्थिती वाकड,पिंपळे निलख यासह अनेक भागात दिसून येत होती. (वार्ताहर)


 प्रभाग क्रमांक २० मधील भारतीय जैन संघटना विद्यालय मतदान केंद्रावर खोली क्रमांक ४ मध्ये नरेश भवरलाल चौधरी यांच्या नावामध्ये साम्य असलेल्या एका दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नरेश चौधरी यांचे प्रदत्त पद्धतीने मतदान करून घेतले.
 प्रभाग क्रमांक २० मधील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार प्रसाद अरबूज यांच्या निवडणूक चिन्ह नारळ समोरील बटण दाबल्यानंतर मतदान केल्याचा दिवा लागत नसल्याचे समोर आल्यानंतर एक तास मतदान बंद करण्यात आले. अरबूज यांची मशिन बदलून दिल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. यापूर्वी देखील प्रसाद अरबूज यांच्या जागेवर त्यांचे बंधू प्रसन्न अरबूज हे निवडणूक लढविणार होते; परंतु ऐनवेळी त्यांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्यामुळे ऐनवेळी प्रसाद अरबूज हे निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत.
 नेहरुनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वच मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी केल्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.
 सायंकाळी ५ नेहरुनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील मतदान केंद्राजवळ असलेल्या क्रांती चौक येथे हाणामारीची घटना घडली.यामुळे नेहरुनगरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
४अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांची घटनास्थळी तातडीने भेट दिली. नेहरुनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वच मतदान केंद्रांबाहेर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे सायंकाळी सातला मतदान संपले.

साडेपाचला केंद्र बंद

 अगदी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांचा सारखाच ओघ असल्याने सायंकाळी बरोबर साडे पाच वाजता रांगेत उभे असणारे अगदी मोजकेच मतदार उभे होते. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत मतदानप्रक्रिया संपली. सकाळी तुरळक असणारी गर्दी दुपारी १२ नंतर वाढली. मात्र ही गर्दी कायम राहिल्याने मतदानाची टक्केवारी वाढतच गेली . दिवसभर मतदार मतदान करीत असल्याने मतदान बंद झाल्यावर मला मतदान करायचे होते, असे म्हणणारे कोणीच आले नाही.

Web Title: Spontaneous participation of voters in societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.