क्रीडा दिन विशेष - क्रीडानगरीला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:55 AM2018-08-29T01:55:49+5:302018-08-29T01:56:13+5:30

कोट्यवधीचा खर्च वाया : महापालिका लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

Sports Day Special - Athletic for Athletes | क्रीडा दिन विशेष - क्रीडानगरीला लागली घरघर

क्रीडा दिन विशेष - क्रीडानगरीला लागली घरघर

Next

पिंपरी : औद्योगिकनगरी, उद्याननगरी, हरितनगरी अशी वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. महापालिकेने कोट्यवधीचा खर्च करून विस्तीर्ण क्रीडांगणे तयार केली आहेत. मात्र, इच्छाशक्ती अभावी व दुरवस्था झाल्याने ती वापराविनाच पडून आहेत.

पिंपरी-चिंचवडची गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट सिटी अशी वाटचाल सुरू आहे. योग्य पद्धतीने नियोजन झाल्याने प्रशस्त रस्त्यांबरोबरच क्रीडांगणे ही शहराची ओळख बनली आहे. मात्र, क्रीडा विभागाकडे सत्ताधाºयांचे असणारे दुर्लक्ष यामुळे क्रीडांगणे असूनही त्याचा वापर होत नाही. तसेच क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक नसल्याने अनेक क्रीडांगणे वापराविनाच पडून आहेत. याकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. महापालिका क्षेत्रात नेहरूनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडिअम, निगडी प्राधिकरणात मदनलाल धिंग्रा मैदान, थेरगावला दिलीप वेंगसरकर अकादमी, चिंचवडगावात मोरया क्रीडा संकुल, नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी मैदान आहे. तसेच इंद्रायणीनगर, भोसरी येथे अ‍ॅथलेटिक्ससाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल उभारले असून, ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे. तसेच अनेक प्रभागांमध्ये बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट उभारले आहेत.

स्पर्धांच्या आयोजनावर भर
४सत्ताधाºयांचा ओढा या राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा घेण्याकडे अधिक असतो. त्यात स्थानिक खेळांडूना संधी मिळत नाही. तसेच मोठमोठे क्रीडा प्रकल्प कसे उभारता येतील याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष असते. महापौर चषक स्पर्धांवरही मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. मात्र, दुरवस्था झालेल्या क्रीडांगणाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

क्रीडा क्षेत्रावरील निधी खर्च होईना
क्रीडा क्षेत्रासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच टक्के निधी दिला आहे. मात्र, हा निधी योग्य पद्धतीने खर्च होत नाही. खेळाडूंच्या प्रशिक्षणावर खर्च केला जात नाही. खेळाडू घडविणारी क्रीडा संकुले कमी आहेत. प्राधिकरण परिसरातील बॅडमिंटन हॉल खासगी संस्थांना दिला आहे. ते लोक संबंधित क्रीडांगण भाड्याने देऊन पैसे उकळत आहेत. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानेच क्रीडा क्षेत्राचे व्यावसायिकीकरण होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. क्रीडा समितीचेही काम समाधानकारक नसल्याचा फटका स्थानिक खेळाडूंना बसत आहे.

1महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रीडांगणे आहेत. मात्र त्यांचा वापर होत नसल्याने पडून आहेत. तसेच विविध क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे खासगी संस्थांचे पेव फुटले आहे. क्रीडा प्रशिक्षक वाढविण्याबाबत महापालिकेचे धोरण नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेतर्फे १२ तरण तलाव निर्माण केले आहेत. त्यांचे व्यवस्थापन खासगी संस्थांना दिले आहे. त्यामुळे खासगी संस्थांची दुकानदारी सुरू असते. तरण तलाव दुरुस्तीची कामे उन्हाळ्यातच करण्यात येतात. वास्तविक उन्हाळ्यात तलाव सुरू राहणे आवश्यक आहे.

2अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना क्रीडा विभागाच्या सक्षमीकरणास वेळ नाही. मात्र, क्रीडांगणे उभारणे आणि साहित्य खरेदी करणे यासाठी अधिक प्रमाणावर प्रशासनास रस असतो. क्रीडा प्रकार वाढावेत आणि क्रीडा क्षेत्राचा, खेळाडूंचा विकास व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. क्रीडा क्षेत्रासाठी असणारा निधी पुरेपूर वापरला जावा, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून होत आहे.

Web Title: Sports Day Special - Athletic for Athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.