दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 07:39 PM2017-12-11T19:39:10+5:302017-12-11T19:43:45+5:30

एस. टी. बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ घडली.

ST driver seriously injured in dehu road after throne stone by a two-wheelerer | दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार

दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार

Next
ठळक मुद्देचालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमीसरकारी कामात अडथळा आणून बसचे नुकसान करून दुचाकीस्वार पसार

देहूरोड : मुंबईकडून पुण्याकडे जात असलेल्या एका  दुचाकीवरील  मागे बसलेल्या  इसमाने पंढरपूरहून तळेगाव दाभाडे येथे चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सेंट ज्यूड हायस्कूलजवळ घडली असून संबंधित चालकावर कासारवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दगड मारून संबंधित दुचाकीस्वार पळून गेले आहेत.
राहुल मधुकर मोरे (वय ३६, रा चिंचोली, पो. देहूरोड, ता. हवेली) असे गंभीर जखमी झालेल्या बसच्या चालकाचे नाव असून याबाबत बसचा वाहक श्रीकांत गायकवाड (वय २८, रा. तळेगाव दाभाडे, मूळ गाव तळणी, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूरहून तळेगाव दाभाडे येथे चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस एमएच १४  बीटी २८२१) रविवारी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी देहूरोड येथील सेंट ज्यूड हायस्कूलजवळ आली असताना मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने चालकाच्या बाजूच्या काचेवर दगड फेकून मारल्याने दगड चालकाच्या कपाळावर लागल्याने चालक गंभीर जखमी झाला असून सरकारी कामात अडथळा आणून बसचे नुकसान करून दुचाकीस्वार पळून गेले असून त्यांच्यावर कलम ३५३, ३३२, ३३६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: ST driver seriously injured in dehu road after throne stone by a two-wheelerer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.