ST Employee Suicide: पिंपरीत एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:01 IST2022-02-27T20:01:40+5:302022-02-27T20:01:48+5:30
एसटी कर्मचऱ्याच्या मागे तीन मुलं पत्नी असा परिवार

ST Employee Suicide: पिंपरीत एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्याने राहत्या घरातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एसटी काॅलनी, सांगवी येथे शनिवारी (दि. २६) रात्री नऊच्या ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. संजय बंकट सरवदे (वय ४३), असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पाठीमागे तीन मुलं पत्नी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचारी संजय सरवदे हे पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभ नगर एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरात पत्नी, मुलांसोबत जेवण झाल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन संजय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही वडील बाथरुममधून बाहेर आले नाहीत, म्हणून मुलांनी बाथरूमचा दरवाजा ढकलून पाहिलं असता संजय यांनी गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.