सेंट उर्सुला स्कूल अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2015 02:09 AM2015-08-22T02:09:04+5:302015-08-22T02:09:04+5:30

शहर शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट उर्सुला स्कूलने संभाजीनगरच्या कमलनयन बजाज स्कूलचा २-० ने पराभव करीत १७ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद प्राप्त केले

St. Ursula School, Ajinkya | सेंट उर्सुला स्कूल अजिंक्य

सेंट उर्सुला स्कूल अजिंक्य

googlenewsNext

पिंपरी : शहर शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट उर्सुला स्कूलने संभाजीनगरच्या कमलनयन बजाज स्कूलचा २-० ने पराभव करीत १७ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद प्राप्त केले. कर्णधार कार्तिक नटराजन याने दोन्ही गोल करीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. वाकडच्या इन्फंट जिजस स्कूल संघाने तिसरा क्रमांक मिळविला.
मासुळकर कॉलनी येथील केशवराव हेडगेवार मैदान येथे गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात पूर्वार्धात नटराजन याने पहिला गोल नोंदवीत १-० ने आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात त्याने आणखी एक गोल नोंदवीत २-० ने आघाडी वाढविली. त्याला अनिकेत ठोंबरे याने पास दिला, तर सायरस मॅसी, देवेन नायडू यांनी त्याला सुरेख साथ दिली. गोलरक्षक धनंजय दिमले याने बजाजचे आक्रमण परतवून लावले. बजाजकडून प्रतीक बिरजे, देवेंश पटेल, गोलरक्षक शुकराज सिंग यांनी चांगला खेळ केला. मात्र, पराभव टाळू शकले नाहीत. वाकडच्या इन्फंट जिजस स्कूलने गटात तिसरे स्थान पटकाविले.
काल झालेल्या उपांत्य सामन्यात उर्सुला स्कूलने इन्फंट जिजस स्कूलचा सडनडेथमध्ये ६-५ ने पराभव केला. निर्धारित वेळेत एकही गोल झाला नाही. टायब्रेकरमध्ये उर्सुलाच्या अ‍ॅन्सेल डिसुजा, कार्तिक नटराजन, अनिश कुलकर्णी, अनिकेत ठोंबरे आणि जिजस स्कूलच्या ऋषिकेश कांबळे, अनुराग गोविलकर, प्रथमेश सपकाळ, यश जाधव या चौघांनी गोल करीत ४-४ बरोबरी साधली. सडनडेथमध्ये इवेन नायडू, प्रणव कुष्णकुमार यांनी गोल करीत उर्सुलाला विजय मिळवून दिला. जिजसकडून शंतनु निंबाळकर हा एकटाच गोल करू शकला. बजाज स्कूलने इंदिरा स्कूलचा १-० ने निसटता पराभव केला. अभिराज देशपांडेने विजयी गोल नोंदविला.
गुरुवारपासून १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यांना सुरुवात झाली. या गटात एकूण ६१ संघांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यानंद भवन स्कूलने डॉ. डी. वाय. पाटील स्कूलचा २-० ने पराभव केला. दोन्ही गोल विनय पंडिने केले. सेंट उर्सुला स्कूलने गणेश स्कूलचा ४-० ने एकतर्फी पराभव केला. निखिल करंजकरच्या एका गोलमुळे एसएनबीपी स्कूलने डी. आय. सी. स्कूलचा १-० ने पराभव केला. प्रफुल्ल शेट्टीच्या एकमेव गोलमुळे सीएमएस स्कूलने राजीव गांधी विद्यालयाचा १-० ने पराभव केला. (प्रतिनिधी)

Web Title: St. Ursula School, Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.