चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 03:07 AM2018-10-30T03:07:22+5:302018-10-30T03:07:57+5:30

नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.

Staff reached by four hours; Even after the winding up, the MSEDC | चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

Next

दिघी : आदर्शनगरमधील छत्रपती संभाजीमहाराज चौक व आजूबाजूच्या परिसरातील विद्युत खांबावरून दिला गेलेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शिवाय अचानक तारा तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडत असल्याची ताजी घटना हिंदू कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.

सकाळी सात वाजता अचानक स्पार्किं ग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली तार तुटून खाली पडली. नशीब बलवत्तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी वा कुणाला इजा झाली नाही. तार तुटून खाली पडताच अर्थिंगमुळे तारेमधील वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊनसुद्धा नागरिकांनी काळजी घेत नागरिकांना सजग केले. या वेळी स्थानिक नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या तक्रार निवारण कक्षाच्या नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र कर्मचाऱ्यांनी दुसºया नंबरवर फोन करून तक्रार देण्यास सांगितले. दुसºया नंबरवर तक्रार देऊनही तीन चार तास उलटूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांनी तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीच्या गहाळ कारभारावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खबरदारी : थोडक्यात बचावली मुले
ज्ञानेश्वर पार्कमध्ये सुद्धा स्पार्किंग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली वायर जमिनीलगत आली होती. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खेळणाºया लहान मुलांना विजेचा धक्का बसण्यापासून थोडक्यात बचावला. या वेळी परिसरातील दीपक कुलकर्णी यांनी वेळीच खबरदारी घेत तुटलेल्या वायरींना वर बांधून ठेवले. ही माहिती अधिकाºयांना देण्यात आली. या घटनेतसुद्धा कर्मचारी यांनी वीजपुरवठा खंडित झाला नाही व तशी कुणाची तक्रार नसल्याने काम न करता व या घटनेचे कारण न शोधता काढता पाय घेतला.

घटनांमध्ये होतेय सातत्याने वाढ
वीज तारा तुटून पडल्याच्या घटना आदर्शनगर परिसरात वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी दिघीतील सह्याद्री कॉलनीमध्ये तारा तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्या वेळेससुद्धा महावितरण कंपनीची दिरंगाई प्रकर्षाने पुढे आली होती. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील बाजारपेठ, आदर्शनगर परिसर, ज्ञानेश्वर पार्क, गजाननमहाराज नगर अशा अनेक भागांतील भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत. या ठिकाणी एकाच विद्युत खांबावर असलेले वायरींचे जाळे झाल्याने वीजपुरवठा खंडित होणे, तारा तुटून पडल्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाययोजना करून भूमिगत केबलची कामे होणे आवश्यक आहे.

Web Title: Staff reached by four hours; Even after the winding up, the MSEDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.