धम्म अभियानास प्रारंभ
By admin | Published: October 6, 2016 03:01 AM2016-10-06T03:01:42+5:302016-10-06T03:01:42+5:30
ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड बुद्धविहार ते नागपूर येथील दीक्षाभूमीदरम्यान पाच ते १६ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या नवव्या धम्म अभियानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या
देहूरोड : ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड बुद्धविहार ते नागपूर येथील दीक्षाभूमीदरम्यान पाच ते १६ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या नवव्या धम्म अभियानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते धम्मरथाला ध्वज दाखवून बुधवारी सुरुवात झाली. धम्मरथाच्या माध्यमातून धम्म अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
धम्म अभियान संयोजन समिती व धम्म अभियान युवा समिती यांच्या वतीने अभियान आयोजित केले आहे. देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमी येथे आंबेडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन व धम्म अभियान स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या हस्ते बौद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्या चिंचोली येथील प्रकाश गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कमलाकर धिवार व सदबा गायकवाड, कॅन्टोन्मेंट सदस्य गोपाळ तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, प्रा. दि. बा. बागुल, प्रकाश गायकवाड, पंचायत समितीचे माजी सदस्य राजू आगळे, संजय आगळे, राजेंद्र बढेकर, अविनाश आगळे उपस्थित होते. गहुंजेतीळ समता मित्र मंडळ व बौद्ध महासभा यांच्या वतीने आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला. (वार्ताहर)